संचारबंदीत अडीच टन सुगंधीत तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:33+5:302021-04-19T04:32:33+5:30
या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अ. प्र. देशपांडे यांना देण्यात आली. त्यावरून अन्न सुरक्षा ...
या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अ. प्र. देशपांडे यांना देण्यात आली. त्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी पी. व्ही. मानवटकर, भा. गाे. नंदनवार यांनी घटनास्थळ गाठून अहवाल तयार केला. या अहवालावरून दाेन्ही ट्रकसह ७३ लाख ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अड्याळ पाेलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती, पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पाेलीस उपनिरीक्षक रेवतकर, हवालदार रवी बाेरकर, विजय राऊत, तुळशीदास माेहरकर, नितीन महाजन, गेंदेलाल खैरे, हरिदास रामटेके, किशाेर मेश्राम, क्रिष्णा बाेरकर, अमाेल खराबे, संदीप भानारकर, मंगेश माळाेदे, भूषण मेश्राम, जितेंद्र वैद्य यांनी केली.
बाॅक्स
आंतरराज्यीय तस्करीचा पर्दाफाश
छत्तीसगढ राज्यातून माेठ्या प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची महाराष्ट्रात आयात हाेते. राष्ट्रीय महामार्गाने ही वाहतूक हाेते. ट्रकद्वारे गुटख्याची खेप पाेहाेचविली जाते. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईही आंतरराज्यीय पर्दाफाश झाला असून, लवकरच माेठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता एलसीबीचे प्रमुख जयवंत चव्हाण यांनी सांगितले.