Bhandara | गोसेच्या उजव्या कालव्यात नागपूरचे दोन कापड विक्रेते गेले वाहून, शोध सुरु

By ज्ञानेश्वर मुंदे | Published: August 31, 2022 06:17 PM2022-08-31T18:17:08+5:302022-08-31T18:17:44+5:30

पवनी येथील घटना : आंघोळीसाठी उतरले होते कालव्यात

Two cloth sellers from Nagpur were washed away in the right canal of Gosekhurd | Bhandara | गोसेच्या उजव्या कालव्यात नागपूरचे दोन कापड विक्रेते गेले वाहून, शोध सुरु

Bhandara | गोसेच्या उजव्या कालव्यात नागपूरचे दोन कापड विक्रेते गेले वाहून, शोध सुरु

Next

भंडारा : गावोगावी जावून कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात वाहून गेलेल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पवनी येथे घडली. आंघोळीसाठी कालव्यात उतरले असता एकमेकांना  वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही वाहून गेले. पवनी पोलीस शोध घेत असून त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता.

नईम खान लाल खान (२२) आणि अमिन शहा लाल शहा (२२) दोघे रा. अब्बुमियानगर भांडेवाडी नागपूर अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहे. मुळचे मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी असून गत काही दिवसापासून कापड व्यवसायाच्या निमित्ताने नागपूरात राहतात. गावोगावी जावून कपडे विक्री करतात. बुधवारी चौघेजण एका व्हॅनने पवनी येथे कापड विक्रीसाठी आले. निलज मार्गावरील गोसेखुर्द उजव्या कालव्यात आंघोळीसाठी नईम खान आणि अमिन खान उतरले. मात्र यापैकी एक जण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला मात्र कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने दोघेही वाहून गेले.

हा प्रकार व्हॅनमध्ये बसून असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ पवनी पोलिसांना सूचना दिली. ठाणेदार दिलीप गढरी पथकासह घटनास्थळी पोहचले. गोसेखुर्द प्रशासनाला सूचना देवून कालव्यातील पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला. कालव्याच्या तिराने या दोघांचाही शोध घेण्यात आला. मात्र उत्त लिहिस्तोवर दोघांचाही थांगपत्ता लागला नव्हता. दरम्यान, पवनी तालुक्यातील अत्री येथे तीन तरुणांचा मुरुमाच्या खाणीत बुडून मृत्यू झाल्याच्या पाठोपाठ आता दोन तरुण कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली. 

Web Title: Two cloth sellers from Nagpur were washed away in the right canal of Gosekhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.