दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींना पळविले

By admin | Published: May 11, 2016 12:50 AM2016-05-11T00:50:03+5:302016-05-11T00:50:03+5:30

दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेले. ही घटना भंडारा शहरातील दोन वेगवेगळ्या वॉर्डात घडली. या घटनेमुळे शहरातील पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

In two days, two minor girls escaped | दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींना पळविले

दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींना पळविले

Next

भंडारा शहरातील घटना : पालकांमध्ये भीतीचे वातावरण
भंडारा : दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेले. ही घटना भंडारा शहरातील दोन वेगवेगळ्या वॉर्डात घडली. या घटनेमुळे शहरातील पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातच नव्हे तर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळूवन नेल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांवर आळा बसावा यासाठी ‘दामिनी’ पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. असे असतानाही अल्पवयीन मुलींना पळविण्याच्या घटनेत घट झालेली नाही.
भंडारा शहरातील दोन वेगवेगळ्या वॉर्डातील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेले. यातील एक घटना जमनालाल बजाज वॉर्डात घडली आहे. फुस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन पळवून नेले. ती फिर्यादीच्या घरी मागील पाच वर्षापासून राहत होती. रविवारला तिला अज्ञात व्यक्तीने पळूवन नेले. बराच वेळानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे फिर्यादीने अज्ञात आरोपीविरूध्द अल्पवयीन मुलीला पळूवन नेल्याची तक्रार भंडारा पोलिसात दाखल केली. तपास पोलीस हवालदार कावळे करीत आहे.
दुसरी घटना खात रोडवरील वैशालीनगर येथील आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी फिर्यादीची नात आहे. सोमवारला ही मुलगी सायकलने घराबाहेर पडली. यावेळी तिने तासभरात घरी परतेल असे कुटुंबियांना सांगितले. मात्र, बराच वेळ होवूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आजोबाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. सलग दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: In two days, two minor girls escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.