मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकले दोन अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:39+5:302021-09-19T04:36:39+5:30
गत तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने दहेगाव जंगल परिसरातील मुरमाडी येथील तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत आहे. ...
गत तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने दहेगाव जंगल परिसरातील मुरमाडी येथील तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत आहे. तलाव ओव्हरफ्लो होत असल्याने तलावातील वाहून जाणारे मासे पकडण्यासाठी तलावाच्या पाळीवर जाळे लावण्यात आले आहे.
दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी जवळपास ८ फूट लांब व १२ ते १५ किलो वजनाचा अजगर साप जाळ्यात अडकलेला आढळला. तर १७ सप्टेंबर रोजी त्याच जाळ्यात जवळपास ४ ते ५ फूट लांब दुसरा अजगर साप अडकलेला आढळून आला. या दोन्ही घटनेत गावातील नागरिकांद्वारा सर्प मित्रांच्या सहाय्याने वनरक्षक एस. जी. खंडागळे यांच्या उपस्थितीत दोन्ही अजगर सापांना जिवंत पकडून जंगल परिसरात सोडून जीवनदान देण्यात आले आहे.
180921\177-img-20210918-wa0027.jpg
अजगर सापाला जिवनदान देतांना वनरक्षक खंडागळे व सर्पमिञ