विहिरीत गुदमरल्याने दोन शेतमजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 02:39 PM2023-07-26T14:39:38+5:302023-07-26T14:39:44+5:30

दयाराम सोनीराम भोंडे (३६) आणि मंगेश जय गोपाल गोंधळे (२६) अशी मृत शेतमजुरांची नावे आहेत.

Two farm laborers died due to suffocation in the well in bhandara | विहिरीत गुदमरल्याने दोन शेतमजुरांचा मृत्यू

विहिरीत गुदमरल्याने दोन शेतमजुरांचा मृत्यू

googlenewsNext

- गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : शेतात रोवणीसाठी आलेले मजूर विहीरीमध्ये उतरले. मात्र आत गुदमरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्यातील पेंढरी गावालगतच्या मोगरा-शिवनी शेत शिवारात बुधवारी सकाळी ९ वाजता  घडली.

दयाराम सोनीराम भोंडे (३६) आणि मंगेश जय गोपाल गोंधळे (२६) अशी मृत शेतमजुरांची नावे आहेत. गट पेंढरी गावातील  शेतकरी विष्णू गायधने यांच्या शेतात रोवणीचे काम मजुरांकडून सुरू होते. यासाठी लगतच्या मेंढा भुगाव येथील मजूर कामावर ैहोते. बुधवारी सकाळूी ९ वाजताच्या सुमारास शेताच्या बाजूला असलेल्या जुनाट विहिरीत कासव दिसल्याने हे शेतमजूर विहीरीत उतरल्याची माहिती आहे. मात्र आधी उतरलेला व्यक्ती बेशद्ध झाल्याने दुसरा उतरला. या दोघांनाही पुन्हा वर येताच आले नाही. त्यांना वाचविण्यासाठी सुधीर मोरेश्वर हजारे हा शेतमजूरही विहीरीत उतरला. मात्र त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने तो कसाबसा वर आल्यामुळे बचावला.

ग्रामस्थांच्या मते हे मजूर पाणी काढण्यासाठी आत उतरले होते, तर काहींच्या मते कासव पकडण्यासाठी उतरले होते, अशी चर्चा आहे. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्ही प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले. दोनही शेतमजुरांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two farm laborers died due to suffocation in the well in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू