हृदयद्रावक! भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 06:13 PM2023-06-26T18:13:52+5:302023-06-26T18:15:06+5:30

भंडारा तालुक्यातील वाघबोडी शिवारात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला.

Two farm laborers killed by lightning in Bhandara district | हृदयद्रावक! भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर ठार

हृदयद्रावक! भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर ठार

googlenewsNext

भंडारा : जिल्ह्यात सोमवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान भंडारा तालुक्यातील वाघबोडी शिवारात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ही घटना वाघबोडी येथील तेजराम बडोले यांच्या शेतात दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

यादवराव अर्जुन शहारे (६५)रा.विद्यानगर भंडारा आणि रमेश श्रावण अंबादे (५२) अशी मृतकांची नावे आहेत. खरीप हंगाम अंतर्गत शेतात काग सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. यावेळी या दोन्ही मजुरांनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातीलच एका मोठ्या झाडाचा आधार घेतला. याचवेळी झाडावर वीज कोसळली. यात दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Two farm laborers killed by lightning in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.