बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 05:08 PM2019-01-08T17:08:07+5:302019-01-08T17:08:48+5:30

निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याचा सोमवारी (दि.६) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेल्या दोन शेळी ठार केल्या तर एक बोकड उचलून घेऊन जाण्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

Two goats killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळी ठार

निकवेल येथे शेळीचे पंचनमा करताना जमलेले ग्रामस्थ व सोबत वन कर्मचारी.

Next
ठळक मुद्देनिकवेल : एक बोकड पळविल्याचा शक्यता व्यक्त

निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याचा सोमवारी (दि.६) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेल्या दोन शेळी ठार केल्या तर एक बोकड उचलून घेऊन जाण्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
निकवेल शिवारातील ही दूसरी-तिसरी घटना असल्यामुळे येथील ग्रामस्थ दहशतीमधे वावरतआहेत. येथील गावजवळी ५/१ गट नंबर असलेले सागर सोनावणे यांच्या मळ्यात शेतमंजूर भगवान दगा पवार हा त्याच्या कुटूंबासह रहात असून उदनिर्वाह हे कोण्याच्याही शेता जाऊन काम करणे तसेच शेळी व बोकडसाठी चारा जमा करणे यावर अवलंबून आहे. सोमवारी (दि.६) रात्री त्याच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ल्या करीत दोन शेळींना ठार केले. तसेच एक बोकड पळविल्याची घटना घडली. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. या घटनेनंतर त्यांनी वनकमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. वन कर्मचारी प्रफुल पाटील व त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.
ही घटना गावात तिसरी असून निकवेल येथे या पाहिले राजाराम वाघ या शेतकरी याचे ही पंधरा दिवस पाहिले बिबट्याने शेळी ठार केली होती. या बिबट्याच्या संचारमुळे शेतकरीबांधव रात्रीे शेतात पाणी भरण्यात घाबरत आहे.
वीज वितरण कंपनीने वेळ बदलल्यामुळे रात्रीे शेतकºयांना पाणी भरावे लागते. पण बिबट्याच्या मुक्त संचारामुळे दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरात बिबट्यचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन अधिकाºयांकडे केली. निकवेल वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेरअमन नीलेश वाघ, उपसंरपच मुरलीधर वाघ, पोपट म्हसदे, निलेश खरे, सागर सोनवणे, रामराव अणारे, निलेश वाघ, विशाल वाघ यांच्यासह ग्रामस्थ व शेतकºयांनी केली आहे.
दहिंदुले, जोरण, कंधाणे शिवारात नेहमी आढळणारा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून निकवेल गावात मुक्त संचार करताना दिसत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने शेतकरी, मजूर व पशुपालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागात गेल्या दोन मिहन्यापासून बिबट्याचा संचार आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेत शिवारातील कामे खोळंबली आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे. व ज्या शेतकºयांच्या जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे , त्यांना त्वरीत नुकसान भरपाई दयावी.
- विवेक सोनवणे, अध्यक्ष, निकवेल वन कमिटी.
आमच्या निकवेल शिवारात बिबटयाचा गेल्या एक ते दोन महिन्यांपासुन दहशतीचे वातावरण आहे. आम्ही वारंवार मागणी करुनही बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला नाही.
- नीलेश वाघ, चेरअमन, वि. वि. का. सोसायटी.
 

Web Title: Two goats killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल