मचारणात अस्वलाच्या हल्ल्यात दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:11 PM2018-12-01T22:11:41+5:302018-12-01T22:12:16+5:30

प्रात:विधी आटोपून घराकडे परतणाऱ्या दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. यातील एक व्यक्ती पायाने दिव्यांग आहे. दोन्ही जखमींवर पालांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. १७ दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने गावकºयात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Two injured in ashwala attack | मचारणात अस्वलाच्या हल्ल्यात दोन जखमी

मचारणात अस्वलाच्या हल्ल्यात दोन जखमी

Next
ठळक मुद्देगावात दहशत : हल्ल्याची दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : प्रात:विधी आटोपून घराकडे परतणाऱ्या दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. यातील एक व्यक्ती पायाने दिव्यांग आहे. दोन्ही जखमींवर पालांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. १७ दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने गावकºयात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जनार्दन कवडू कातोरे (५२) रा.मचारणा आणि गिरीधारी जिवतू कुळसंगे रा.तुमसर असे जखमींचे नाव आहे. हे दोघे प्रात:विधीसाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना मागाहून आलेल्या अस्वलाने या दोघांवर अचानक हल्ला केला. यात जनार्दनच्या डाव्या हाताला मोठी दुखापत झाली तर जनार्दन हा एका पायाने दिव्यांग असल्याने त्याला पळताही आले नाही. तोही या हल्ल्यात जखमी झाला. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गिरीधारी कुळसुंगे हा गोसेखुर्द कालव्यावर चौकीदारी काम करतो. या घटनेची माहिती पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. ठाणेदार अंबादास सुनगार, वनपरिक्षेत्राधिकारी बेलखेडे, हमीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
गत १७ दिवसांतून अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. १३ नोव्हेंबरच्या पहाटे एका अस्वलाने हल्ला केला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा या घटनेची पुनरावृती झाली. अस्वल प्रौढ असून तिच्यासोबत दोन पिल्ले आहेत. या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी विलास बेलखेडे यांच्याशी संपर्क साधला असता गावकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून सावध राहावे, रात्री बेरात्री बाहेर जाऊ नये, वन्यप्राण्यांना त्रास होईल असे कोणतेही काम करू नये असे सांगितले. गावकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करावे आणि अस्वल व पिलांचा सुरक्षीत ठिकाणी बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच संगीता घोनमोडे यांनी केली.

Web Title: Two injured in ashwala attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.