दोन लाख ६५ हजार बालकांचे रूबेला-गोवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:21 PM2018-11-16T22:21:32+5:302018-11-16T22:21:57+5:30
गोवर आजाराचे दुरीकरण व रूबेला आजारावर नियंत्रण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीतील दोन लाख ६५ हजार हजार ८५४ बालकांना गोवर-रूबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबररोजी होणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षीत असून या मोहिमेत पालक शिक्षक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोवर आजाराचे दुरीकरण व रूबेला आजारावर नियंत्रण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीतील दोन लाख ६५ हजार हजार ८५४ बालकांना गोवर-रूबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबररोजी होणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षीत असून या मोहिमेत पालक शिक्षक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा कालावधी चार ते पाच आठवड्याचा आहे. पहिला व दुसरा आठवडा शैक्षणिक संस्था व शाळा-अंगणवाड्यांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. तिसºया व चवथ्या आठवड्यात आरोग्यसेवा व संस्था आणि इतर बाह्य संपर्क व मोबाईल संस्थांद्वारे तर पाचव्या आठवड्यात गोवर-रूबेला लसीकरणातून सुटलेल्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात नऊ महिले ते १५ वर्ष वयोगटातील दोन लाख ६५ हजार ८५४ मुला-मुलींना लस देण्यात येणार आहे. ही लस १४२८ शाळा व १४१७ अंगणवाड्यांमधून देण्यात येईल. यासाठी १७७२ लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थी व पालकांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातून मोहिमेविषयी जनजागृती करण्यात येईल. रूबेलाची लस अत्यंत सुरक्षित असून अपवादात्मकरित्या उद्भवलेल्या प्रसंगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सुद्धा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. मोहिमेसाठी पुरेशी लस उपलब्ध झाली आहे. पालकांनी घाबरून न जाता आपल्या मुलांना गोवर-रूबेला लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.
आरोग्य विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागांमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे. यात इंडियन मेडिकल असोसिएशन, रेडक्रॉस सोसायटी, सेवाभावी संस्था यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. खाजगी शैक्षणिक संस्था व इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांनी ही मोहिम राबविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, आयएमएचे डॉ. अशोक ब्राम्हणकर, डॉ. मेश्राम, डॉ. माधुरी माथुरकर उपस्थित होते.
बोटाला शाई आणि कार्ड
या मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांना लस दिली जाईल त्यांच्या बोटाला शाई लावण्यात येईल. तसेच लस दिल्याचे कार्ड देण्यात येणार आहे. सोबत प्रत्येक लसीकरण केंद्रावर वैद्यकीय सुरक्षा कीट उपलब्ध असणार आहे. ही मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.