मोहफुलांसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:03 PM2018-04-27T23:03:49+5:302018-04-27T23:03:49+5:30
विना पास परवाना मोहफुल भरलेले वाहन करडी मार्गे तुमसरकडे जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे करडी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. कसून तपासणी केली असता पिकअप वाहनासह मोहफुल ताब्यात घेण्यात आले. दोन आरोपींना अटक करण्यात आली.ही कारवाई गुरूवारी दुपारी ११.२० वाजता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : विना पास परवाना मोहफुल भरलेले वाहन करडी मार्गे तुमसरकडे जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे करडी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. कसून तपासणी केली असता पिकअप वाहनासह मोहफुल ताब्यात घेण्यात आले. दोन आरोपींना अटक करण्यात आली.ही कारवाई गुरूवारी दुपारी ११.२० वाजता करण्यात आली.
उत्तम शिवकुमार वरकडे (३५) रा. चांदोरी व चुन्नीलाल श्रावण पटले (४२) रा. सोनेगाव ता. लाखनी असे आहे. सोनेगाव येथील पिकअप क्रमांक एमएच ३४ एम ३२१२ चुन्नीलाल पटले यांचे मालकीचे वाहन विना पास परवाना अवैध मोहफुल भरून करडी मार्गे तुमसरकडे जात असल्याची गुप्त माहिती करडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी करडी गरदेव चौकात सापळा रचला.
वाहन येताच थांबवून तपासणी केली असता पिकअप डाला वाहनासह मोहफुल ताब्यात घेण्यात आले. दोन आरोपींना अटक करण्यात आली. सोनेगाव येथील पिकअप डाला क्रमांक एमएच ३४ एम ३२१२ चुन्नीलाल पटले यांचे मालकीचे वाहन तुमसरकडे जात असल्याची गुप्त माहिती करडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी करडी गरदेव चौकात सापळा रचला. वाहन येताच थांबवून तपासणी केली असता वाहनात २१ क्विंटल ६० किलो मोहफुल मिळून आला. त्यामुळे सदर माल व वाहन तसेच चालक मालक ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई करडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आसाराम नंदेश्वर, हवालदार विजय सलामे, गौरीशंकर गौतम, वाहन चालक पोलीस हवालदार देवानंद शिवणकर यांनी केली. त्यांच्याकडून एकूण २ लाख १८४० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.