कोंढा परिसरात म्युकरमायकाेसिसचे दोन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:05+5:302021-06-16T04:47:05+5:30
कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना अनेक आजार होत असल्याचे सिद्ध होत असल्याने या आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक ...
कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना अनेक आजार होत असल्याचे सिद्ध होत असल्याने या आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ म्युकरमायकोसिस रुग्ण आढळले असून आतापर्यंत २ रुग्ण दगावले आहे. दोन व्यक्तींना कायम अंधत्व आले आहे.अशी काही लक्षणे आढळल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी कान, नाक व घसा तज्ज्ञ तसेच दंतरोग तज्ज्ञ यांचेकडून तपासणी करणे गरजेचे आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांंनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोंढा परिसरात कोरोना संसर्ग दुसरी लाट मोठी घातक होती यामध्ये अनेक गावातील तरूण ,वयस्कर आणि वृद्धांचा मृत्यू झाला. संसर्ग झालेल्या लोकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. या आजारात नाकावर सूज येणे, चेहऱ्याचे स्नायू दुखणे, नाकातून रक्त स्त्राव होणे, डोळा दुखणे असे प्राथमिक लक्षणे दिसतात तेव्हा काळजी घेण्याचे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल बोरकर यांनी केले आहे.