साकोलीत दुचाकी चोरांना अटक
By admin | Published: March 15, 2017 12:16 AM2017-03-15T00:16:35+5:302017-03-15T00:16:35+5:30
१५ दिवसापासून साकोली पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडण्याची मोहीम सुरु केली आहे. यात पोलिसांना सहा आरोपींना अटक केली असून ...
साकोली पोलिसांची कारवाई : घरफोडीतील आरोपी मोकाटच
साकोली : १५ दिवसापासून साकोली पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडण्याची मोहीम सुरु केली आहे. यात पोलिसांना सहा आरोपींना अटक केली असून या चोरांकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी दिली. यापूर्वी झालेल्या घरफोडी, लवारी मार्गावरील वाटमारी या चोरीचा मात्र अद्याप शोध लागला नाही.
गोंदिया पोलिसांनी अर्पित जनबंधू याला दुचाकी क्रमांक एम.एच. ३५ डब्लू ०२८१ विक्री करताना रंगेहात अटक केली व जनबंधू याला साकोली पोलीसांच्या स्वाधीन केले. तपासात दुचाकी खरेदी करताना आनंद नागपुरे (३९) रा.गोंदिया याला अटक केली. या चोरीचा तपास करताना तपासात एम.एच. ३५ एन ७८५० ही गाडी जमनापूर परिसरात ठेवली असल्याची माहिती आरोपींनी दिली. पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात घेतली आहे.
याच प्रकरणात सौरभ खोटेले (१९) रा.कुंभली याचाही समावेश असल्याचे तपासात सिद्ध झाले. पोलिसांनी खोटेले यालाही अटक केली आहे. तर याच तपासात पंचशील वॉर्ड येथील नंदागवळी यांच्या घरून पोलिसांनी एम.एच. ३६ यु ७५१६ ही दुचाकी ताब्यात घेतली. याच तपासात पुन्हा साकोली येथून एम.एच. ३१ ईटी ९१५६ ही दुचाकी सापडली असून याप्रकरणी पोलिसांनी सौरभ मेश्राम (२१) व सुयोग मेश्राम (२६) रा.लाखनी यांना ताब्यात घेतले आहे.
या दुचाकी मालकीचे कागदपत्र यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांनाही ताब्यात घेतले आहे. या दुचाकी प्रकरणात अजून आरोपी असल्याची माहिती आहे.
या तपासात आतापर्यंत पोलिसांनी पाच दुचाकी व सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, पोलीस जमादार बागडे, भजने, पाटील, झलके, खराबे, लोंबले करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
घरफोडी व वाटमारीचे आरोपी मोकाटच
साकोली येथील अभिजीत मोटर्स, तिर्थ एक्वा या दुकानात चोरी होवून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला. तर लवारी मार्गावर मुलींना अडवून मुलींच्या गळ्यात सोन्याची चेन हिसकावून नेली. तर जमनापूर येथील साई मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरांनी हजारो रुपये लंपास केले. या घटनेमधील आरोपी मात्र अजूनपर्यंत मिळाले नाहीत.