चाकूच्या धाकावर लुटणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 09:18 PM2021-12-26T21:18:32+5:302021-12-26T21:19:47+5:30

सिनेस्टाइल पद्धतीने ट्रकसमोर दुचाकी आडवी करून ट्रकला अडविले, तसेच ट्रकचालक मनोज बडवाईक याला कोयता व चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या केबिनमधून खाली खेचले, तसेच त्याच्याकडे असलेली १७ हजार रुपयांची रोकड व मोबाइल जबरीने हिसकावून पळ काढला. बडवाईक यांनी वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

The two robbers were stabbed to death | चाकूच्या धाकावर लुटणारे दोघे गजाआड

चाकूच्या धाकावर लुटणारे दोघे गजाआड

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तब्बल तीन महिन्यांपूर्वी कोयता व चाकूच्या धाकावर एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी शेर ऊर्फ हर्षद राहुल मेश्राम (२४), रा. नेहरू वाॅर्ड वरठी व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा अटक करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. शेरूला नागपूर येथून रविवारी पकडण्यात आले.
माहितीनुसार २७ सप्टेंबर २०२१ रोजी मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील रहिवासी असलेले मनोज सुरसराम बडवाईक हे ट्रकमधील गिट्टी खाली करण्यासाठी पांढराबोडी येथे आले होते. याचवेळी शेरू ऊर्फ हर्षद मेश्राम व त्याच्यासोबत एक अल्पवयीन बालक दुचाकीवर आले. सिनेस्टाइल पद्धतीने ट्रकसमोर दुचाकी आडवी करून ट्रकला अडविले, तसेच ट्रकचालक मनोज बडवाईक याला कोयता व चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या केबिनमधून खाली खेचले, तसेच त्याच्याकडे असलेली १७ हजार रुपयांची रोकड व मोबाइल जबरीने हिसकावून पळ काढला. बडवाईक यांनी वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण,  एपीआय नितीनचंद्र राजकुमार, भूषण पवार, पीएसआय विवेक राऊत, हेडकॉन्स्टेबल नितीन महाजन, पोलीस नाईक शैलेश बेदूरकर, नंदकिशोर मारबते, प्रफुल्ल कठाणे व स्नेहल गजभिये यांचा चमू कामाला लागला. एपीआय राजकुमार व पीएसआय विवेक राऊत यांनी गोपनीय माहिती काढली. यात सदर गुन्हा हा शेरू ऊर्फ हर्षद राहुल मेश्राम याने त्याच्या साथीदारांसह केला असावा असा कयास बांधला. त्याच वेळेपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेरूच्या मागावर होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथे कारवाई करीत रविवारी पहाटेच्या सुमारास शेरूला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने एका विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या सोबतीने घटनेला अंजाम दिल्याचे कबूल केले. 

शेरू हा सराईत गुन्हेगार 
- शेरू हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याने घटनेनंतर मुंबई येथे पळ काढला होता. दरम्यान, शेरू हा नागपूर येथे त्याच्या मित्राच्या घरी लपलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. 
 

Web Title: The two robbers were stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.