शिष्यवृत्ती परीक्षेत शास्त्री विद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:38 AM2021-08-28T04:38:56+5:302021-08-28T04:38:56+5:30
भंडारा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयातील बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
भंडारा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयातील बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या बारा विद्यार्थ्यांपैकी हिमांसू मोरेश्वर भुरले व दोशांत मोहन लुटे हे दोन विद्यार्थी प्रतिवर्ष बारा हजार रुपये शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. हे विद्यार्थी जनरल लिस्टमध्ये सतराव्या व एकोणिसाव्या क्रमांकावर गुणवंत म्हणून घोषित झालेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी शिक्षिका वीणा सिंगणजुडे यांनी करून घेतली होती. विद्यर्थ्यांच्या यशाने शाळेच्या गुणवत्तेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेलेला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामू शहारे, प्राचार्या केशर बोकडे, शिक्षक प्रतिनिधी नामदेव साठवणे, ज्येष्ठ शिक्षक शरद बडवाईक, उच्च माध्यमिक विभागप्रमुख एस.जी. यावलकर, माध्यमिक विभागप्रमुख शालिकराम ढवळे, परीक्षा विभागप्रमुख अनिल करणकोटे, क्रीडाप्रमुख सुनील खिलोटे, पांडुरंग कोळवते, योगिता कापगते, मेधाविनी बोडखे, विजयकुमार बागडकर, शिक्षक शिक्षिका यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.