वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले, वन परिक्षेत्र अधिकारीही हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:04 AM2021-05-12T10:04:35+5:302021-05-12T10:05:48+5:30

टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन टाक्यात दोन्ही बछडे आढळले. दोन महिन्याचे असलेले दोन्ही बछडे मादी आहेत

Two tiger calves were found dead, forest officials said in bhandara | वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले, वन परिक्षेत्र अधिकारीही हळहळले

वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले, वन परिक्षेत्र अधिकारीही हळहळले

Next

भंडारा : तालुक्यातील गराडा गावानजीक कालव्याच्या सायफन टाक्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले आहेत. बुधवारी सकाळी भंडारा तालुक्याच्या गराडा गावाजवळ ही घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन टाक्यात दोन्ही बछडे आढळले. दोन महिन्याचे असलेले दोन्ही बछडे मादी आहेत. भंडाराचे उपवनसंरक्षक शिवराम भलावी व वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर घटनास्थळी पोहचले असून नेमका कसा मृत्यू झाला याचा शोध सुरु आहे. मृत बछड्यांचे पार्थीव पाहून वनअधिकारीही हळहळल्याचं दिसून आलं. वन विभागाने ते मृतदेह ताब्यात घेतले असून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Web Title: Two tiger calves were found dead, forest officials said in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.