अभयारण्यात दोन वाघांचे दर्शन
By admin | Published: May 24, 2016 12:55 AM2016-05-24T00:55:29+5:302016-05-24T00:55:29+5:30
नागझीरा अभयारण्यात बुध्दपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या पाणवठ्यावरील वन्यप्राण्यांच्या गणनेत नविन नागझीरा येथील...
शिवशंकर बावनकुळे साकोली
नागझीरा अभयारण्यात बुध्दपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या पाणवठ्यावरील वन्यप्राण्यांच्या गणनेत नविन नागझीरा येथील दोन मचारणीवरुन २ वाघाचे निसर्गप्रेमी प्राणीगणकांना दर्शन झाले. बिबट्यासह अन्य प्राणी पक्ष्यांचे दर्शन झाले.
प्रगणनेत बिबट्या, हरिन, चितळ, सांबर, अस्वल, निलगाय, रानकुत्रा, निलघोडे, रानगवे, इत्यादी वन्यप्राण्यासह मोर, लांडोर इतर पक्ष्याचेही दर्शन झाले. प्रगणकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागला. २४ तास गणनेत १९२ माचाणी वर २०४ प्राणीगणकांच्या सहभागासोबत ११ महिलांचा समावेश होतो.
नागझीरा अभयारण्य परिक्षेत्रात ६० मचाणीवर ७० निसर्ग प्रेमीनीप्राणी गणना केली.
नविन नागझिरा येथे ४० मचाणीवर ४२ प्रणीगणना निसर्गप्रेमी, कोका २२ मचाणी २२ प्राणी गणकाची क्षमता, नवेगाव पार्क ४२ मचाणीवर ४२ क्षमता, नवेगाव वाईल्ड लाईप २८ मचाणीवर २८ प्राणी गणकानी प्राणी गणना केली. अशा वेगवेगळ्या १९२ मचाणीवर २०४ प्राणीगणकांनी सहभाग घेतला.
या अभयारण्यात पाणवठ्यावरील प्रगणना यशस्वीपणे पार पडली. प्राणीगणणेत सहभागी झालेल्या अनेक प्रगणकांना वाघ, बिबट्या, हरिण, चितळ, सांबर, अस्वल, निलगाय, रानकुत्र्यांनी दर्शन दिले. एका मचाणीवर वनविभागाचे एक प्रतिनिधी व स्वयंसेवी अशा दोन व्यक्तीकडून गणना करण्यात आली.
प्रत्येकांच्या मचाणीजवळ शासकीय वाहणांनी त्यांना सोडण्यात आले. नविन नागझीरा येथे दोन मचाणीवर दोन वाघानी दर्शन दिले. पाणवठ्याशेजारच्या मचाणीवर प्रगणकांना बरेचदा व्याघ्रदर्शन झाल्याची माहिती प्रगणकांनी दिली.
प्रगणकांना मचाणीवर नेण्याची वाहणाची व्यवस्था केली होती. दुपारनंतर तुफान वादळ आल्यामुळे काही मचाणी पडल्या होत्या. लगेच त्यांना व्यवस्थीत करण्यात आले. प्रगणना यशस्वीपणे आटोपली.
- न. ब. खंडाते,
सहायक वनसंरक्षक नागझीरा
कोका वन्यजीव अभयारण्यात १०८१ वन्यप्राण्यांची गणना
अनुभव : हिस्त्र तथा तृणभक्षक प्राण्यांची नोंद
युवराज गोमासे करडी/पालोरा
कोका वन्यजीव अभयारण्य हिंस्त्र प्राण्ंयाबरोबर तृणभक्षक प्राण्यांचे सर्वाधिक आवडीचे ठिकाण असल्याचे पुन्हा एकदा प्राणी गणनेतून सिध्द झाले. प्रगणनेदरम्यान वरिष्ठ अधिकारी वर्गाने निरीक्षण केले. कोका वन्यजीव अभयारण्य सन २०१३ मध्ये अस्तित्वात आले तेव्हापासून अभयारण्यातील प्राणी प्रगणनेची ही तिसरी वेळ आहे. बौध्द पौर्णिमेला सकाळी ९ वाजतापासून दुसऱ्या दिवशी याच वेळेपर्यंत पाणवठ्यावर मचानींवर बसून ही गणना करण्यात आली.
पौर्णिमेची रात्र प्रगणकांना सुखद अनुभूती देणारी ठरली. शहरातील धावपळीपासून दूर, शांत ठिकाणी एकाग्रतेने, ध्यानमग्न होवून प्रगणकांबरोबर वनकर्मचारी वर्गाने वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपल्या. विविध प्रकारच्या आवाजांनी रात्रीच्या वेळी चौकस राहण्याची भुमिका पार पाडली.
प्रगणकांसाठी थंड पिण्याचे पाणी व नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर वन्यप्रेमींनी आपल्यासोबत प्राणी पाहण्यासाठी विविध साहित्य आणले होते.
जंगलात बांधलेल्या २२ मचाणीवरुन २३ पुरुष व २ स्त्रिय स्वयंसेवकांचे माध्यमातून प्रगणेत बिबट ५, अस्वल ४६, गवे ८८, चितळ १९९, निलगाव ६३, रानकुत्रे २७, सांबर ४३, मोर ४३, भेंडकी १७, खवल्या मांजर २, मुंगूस १, कोल्हा २, वानर १५५, रानकोंबड्या १, मशन्याउद १, रानडुक्कर ३८७, ससा १ आदी प्राण्यांची गणना करण्यात आली आहे.
बौध्द पौर्णिमेला पाऊस व वादळी वातावरण नव्हते. आकास स्वच्छ असल्याने शितल चंद्रप्रकाशात प्रगणनेचा स्वयंसेवकांना आनंद घेता आला. त्यांना बसण्यासाठी मजबुत मचानींची व्यवस्था करण्यात आली होती. थंड पिण्याच्या पाण्याबरोबर नास्त्याची सोय विभागाचे वतीने करण्यात आली.
- ए. जी. शेडगे, वनक्षेत्राधिकारी
वन्यजीव अभयारण्य कोका