जनावरांची अवैध वाहतूक करणारे दोन वाहने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:14+5:302021-09-02T05:16:14+5:30
लाखांदूर : पहाटेच्या सुमारास दोन बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये निर्दयतेने जनावरांना डांबून अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना लाखांदूर पोलिसांनी पकडले. ...
लाखांदूर : पहाटेच्या सुमारास दोन बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये निर्दयतेने जनावरांना डांबून अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना लाखांदूर पोलिसांनी पकडले. त्यात १० लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक लाखांदूर पोलिसांनी मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान स्थानिक लाखांदूर येथील वडसा-पवनी टी पॉईंटवर गस्तीवर असताना करण्यात आली. या कारवाईत विलास नारायण नाट (३४) व प्रवीण किसन ऊईके (३८ दोन्ही रा. वाकडी जि. गडचिरोली) यांच्या विरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखांदूर येथील पवनी-वडसा टी पॉईंट परिसरात गस्तीवर होते. जनावरांची अवैध वाहतूक करत असलेले दोन वाहन क्रमांक (एम.एच. ३३ जे १५४७) व (एम. एच. ३३ टी ०९१५) गस्तीवर असलेल्या लाखांदूर पोलिसांनी पकडले. दोन्ही गाड्यांची चौकशी व विचारपूस करत जनावरांची अवैध वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या अवैध वाहतुकीदरम्यान आरोपींकडून १ म्हैस ,७ रेडे व दोन वाहनांसहीत सुमारे १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस अंमलदार मनिष चव्हाण, मिलिंद बोरकर, संदीप रोकडे आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गस्तीवर असताना केली.
310821\171-img-20210831-wa0016.jpg
जनावरांच्या अवैध वाहतुक करतांना आढळुन आलेल्या वाहनांवर कारवाई करतांना गस्तीवर असलेले लाखांदूर पोलीस