तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाचा दोनच गावांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:12+5:30

तुमसर तालुक्यात किमान सात ते आठ दिवस अवकाळी पाऊस पडला. ढगाळ वातावरण, कुठे गारपीट झाली. त्यामुळे फळ व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली होती. येथे थातूरमातूर चौकशी व पाहणी करण्यात आली.

Two villages hit by rains in Tumsar taluka | तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाचा दोनच गावांना फटका!

तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाचा दोनच गावांना फटका!

Next
ठळक मुद्देपरसवाडा, लोहारा गावांचा समावेश : २५ टक्के पेक्षा कमी नुकसानीची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. परंतु तालुक्यात केवळ दोनच गावात भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. सदर दोन्ही गावात नुकसानीची टक्केवारी २५ टक्क्यापेक्षा कमीच दाखविण्यात आली. पंचनामे करताना संंबंधित कर्मचारी बांधावर गेले होते काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यात किमान सात ते आठ दिवस अवकाळी पाऊस पडला. ढगाळ वातावरण, कुठे गारपीट झाली. त्यामुळे फळ व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली होती. येथे थातूरमातूर चौकशी व पाहणी करण्यात आली. तालुक्यात केवळ परसवाडा, सिहोरा व लोहारा येथे फळ, भाजीपाला शेतीचे नुकसान झाल्याची नोंद कृृषी विभागाने केली आहे. त्यातही २५ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
शासकीय नियमानुसार २५ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच लाभ होतो. त्यापेक्षा कमी नुकसान झालेल्यांना लाभ होत नाही. वास्तविक स्थिती वेगळी आहे. फळ, भाजीपाला लागवड करणाऱ्यां शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पंचनामे करून संबंधित विभागाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी येथे दखल घेण्याची गरज आहे.

कृषी विभागाने परसवाडा व लोहारा येथे फळ,भाजीपाल्याचे नुकसान २५ टक्क्यापेक्षा कमी झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.
-गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार, तुमसर.

Web Title: Two villages hit by rains in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस