बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 05:00 AM2022-06-15T05:00:00+5:302022-06-15T05:00:21+5:30

कुलदीप गिरधर नारनवरे (३५, रा. धानोरी, कोसमतोंडी, जि. गोंदिया) असे मृताचे नाव असून, ते लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. मंगळवारी दिवशी दुपारी २ वाजताच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच ३५-वाय ६४८३) पारडी येथून तई येथे नातेवाइकाकडे जात होते. त्यावेळी बारव्हा येथून साकोलीकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच १२ - ईएफ ६९१९) खोलमारा गावातल्या वळणावर दुचाकीची सामोरून धडक दिली.

Two-wheeler teacher killed in bus crash | बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक ठार

बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक ठार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : भरधाव एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक ठार झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील बारव्हा ते खोलमारा रस्त्यावरील टी-पॉइंट वळणावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. नातेवाइकाच्या भेटीसाठी जाताना हा अपघात घडला. 
कुलदीप गिरधर नारनवरे (३५, रा. धानोरी, कोसमतोंडी, जि. गोंदिया) असे मृताचे नाव असून, ते लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. मंगळवारी दिवशी दुपारी २ वाजताच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच ३५-वाय ६४८३) पारडी येथून तई येथे नातेवाइकाकडे जात होते. त्यावेळी बारव्हा येथून साकोलीकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच १२ - ईएफ ६९१९) खोलमारा गावातल्या वळणावर दुचाकीची सामोरून धडक दिली. धडक एवढी जबर हाेती की शिक्षक कुलदीप दुचाकीसह खाली काेसळून गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती हाेताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे असलेल्या नागरिकांनी गंभीर अवस्थेत त्यांना बारव्हा आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
शिक्षक कुलदीप यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील आहेत. मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित असलेल्या शिक्षकांच्या मृत्यूने बारव्हा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
पंचनामा दिघाेरीचे सहायक पाेलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय ग्यानिराम गोबाडे, पोलीस नायक कोडापे, पुराम, वैद्य, रणदिवे यांनी केला.

एसटीने घेतले दाेन दिवसात दाेन बळी
भंडारा शहरातील राजीव गांधी चाैकात एसटी बसने साेमवारी दुचाकीला धडक दिल्याने पाेलीस हवालदार दुलीचंद बरवैय्या यांचा साेमवारी मृत्यू झाला हाेता. या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी एसटी बसच्या धडकेत शिक्षक ठार झाला. दाेन दिवसात दाेन कर्मचाऱ्यांचा एसटीने बळी घेतला. 

 

Web Title: Two-wheeler teacher killed in bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात