टँकरखाली चिरडून दोन महिला मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:24 PM2019-06-27T22:24:29+5:302019-06-27T22:24:54+5:30

भरधाव टँकरच्या मागच्या चाकात चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरी बुज. येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या. टँकरही मॉयलचाच होता. या अपघातानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर गावावर शोककळा पसरली.

Two women laborers killed in tanker | टँकरखाली चिरडून दोन महिला मजूर ठार

टँकरखाली चिरडून दोन महिला मजूर ठार

Next
ठळक मुद्देडोंगरी येथील घटना : मॉयल खाणीतून दुचाकीने जात होत्या घरी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भरधाव टँकरच्या मागच्या चाकात चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरी बुज. येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या. टँकरही मॉयलचाच होता. या अपघातानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर गावावर शोककळा पसरली.
वंदना हिरामण सोनेकर (३९), सुनीता जीवन चौधरी - कोहळे (४४) दोन्ही रा. डोंगरी बुज. अशी मृत महिलांची नावे आहेत. गुरुवारी वंदना आणि सुनीता मॉयल खाणीतील काम आटोपून आपल्या दुचाकीने (क्र. एम एच ३६ व्ही ३८६०) ११ वाजताच्या सुमारास डोंगरी बुजकडे जात होत्या. मॉयल खाणीबाहेरील गाव शिवारात समोरुन येणाऱ्या पाण्याच्या टँकरने (एम एच ३६ एफ ०९३४) ने दुचाकीला धडक दिली. यात धडकेत या दोघेही दुचाकीसह टँकरच्या मागील चाकात चिरडल्या गेल्या. आणि जागीच ठार झाल्या. सदर टँकर डोंगरी बुज येथून मॉयल खाणीमध्ये पाणी घेवून जात होता. सदर अपघातानंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. मॉयलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सदर टँकर अनियंत्रीत वेगाने जात असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. या दोन्ही महिलांची शेती मॉयल खाणीत गेली होती. त्यामुळे त्यांना मॉयल प्रशासनाने नोकरी दिली होती. वंदनाच्या मागे एक मुलगा आणि सुनीताच्या मागे एक मुलगी आहे. अपघाताचे वृत्त कळताच डोंगरी बुज. येथील नागरिकांनी घटनास्थळी ्नधाव घेतली. दोघींचे मृतदेह पाहून प्रत्येक जण हळहळतांना दिसत होता. पोलिसांनी पंचनामा केला.
टँकर भंगारावस्थेतील
मॉयलमधील पाण्याचा सदर टँकर भंगार अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यानंतरही मॉयल प्रशासन या टँकरचा उपयोग करीत होते. या अपघाताची चौकशी करुन महिला मजुरांच्या कुटुंबातील सदस्यांना मॉयल प्रशासनाने नोकरी देण्याची मागणी डोंगरी बुज. चे माजी सरपंच तोफलाल रहांगडाले यांनी केली आहे.

Web Title: Two women laborers killed in tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.