तरुणांच्या सतर्कतेने हरणाच्या पाडसाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:16 PM2017-10-26T14:16:17+5:302017-10-26T14:19:17+5:30

मांढळ-कुसारी मार्गावर वाट चुकलेले हरिणाचे एक गोंडस पाडस कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले.

Two youngsters save the life of deer | तरुणांच्या सतर्कतेने हरणाच्या पाडसाला जीवदान

तरुणांच्या सतर्कतेने हरणाच्या पाडसाला जीवदान

Next
ठळक मुद्देवाट चुकलेले हरणाचे पाडसडाव्या डोळ््याला जखम

आॅनलाईन लोकमत
मोहन भोयर
भंडारा: मांढळ-कुसारी मार्गावर वाट चुकलेले हरिणाचे एक गोंडस पाडस कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास आकाश गाढवे व पंकज झंझाड हे दोन युवक या मार्गावरून जात असताना त्यांना अचानक कुत्र् यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता, हरिणाचे एक कोवळे पाडस ज्याचे वय अंदाजे साडेतीन महिन्यांचे असावे ते जिवाच्या आकांताने धावताना व त्या कु त्र् यांच्या हल्ल्याला परतवताना आढळून आले. त्या दोघांनी तात्काळ धाव घेऊन कु त्र् यांना पिटाळून लावले व हरिणाच्या पाडसाला ताब्यात घेतले. या जखमी पाडसाला त्यांनी लगोलग तुमसरच्या वनविभागाच्या कार्यालयात आणले. येथील कर्मचाºयांनी त्या पाडसावर प्रथमोपचार केले असून, लवकरच त्याला जंगलात नेऊन सोडण्यात येणार आहे.

Web Title: Two youngsters save the life of deer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.