देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावरील ‘यू-टर्न’ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:49 PM2018-12-27T21:49:45+5:302018-12-27T21:50:12+5:30

रस्ते सरळ असावेत, वळणमार्ग शक्यतो सरळ करावे असा रस्ते महामार्ग खात्याचा नियम आहे, परंतु तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाला जोडणारा रस्ता यु-टर्न करण्यात आला आहे. खापाकडून देव्हाडी रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक वाहने रेल्वे फाटक मार्गाऐवजी देव्हाडी गावातील अंडरपास मधून जातात. त्यांना रेल्वे फाटकाचा रस्ता दिसत नाही. तुमसर-खापा-गोंदिया रस्त्याचा फलक सुध्दा येथे लावण्यता आला नाही. नियमांना येथे बगल देण्यात आली आहे.

'U-turn' dangerous on the Devadi National Highway | देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावरील ‘यू-टर्न’ धोकादायक

देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावरील ‘यू-टर्न’ धोकादायक

Next
ठळक मुद्देतुमसर-खापा- देव्हाडी-गोंदिया रस्त्याचा संगम : अंधारात होतेय वाहनचालकांची तारांबळ

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ते सरळ असावेत, वळणमार्ग शक्यतो सरळ करावे असा रस्ते महामार्ग खात्याचा नियम आहे, परंतु तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाला जोडणारा रस्ता यु-टर्न करण्यात आला आहे. खापाकडून देव्हाडी रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक वाहने रेल्वे फाटक मार्गाऐवजी देव्हाडी गावातील अंडरपास मधून जातात. त्यांना रेल्वे फाटकाचा रस्ता दिसत नाही. तुमसर-खापा-गोंदिया रस्त्याचा फलक सुध्दा येथे लावण्यता आला नाही. नियमांना येथे बगल देण्यात आली आहे.
मनसर -तुमसर-गोंदिया असा नव्याने राष्ट्रीय महामार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली. राष्ट्रीय मार्गाचे काम जोमात सुरु आहे. प्रथम चरणात रस्त्यावरील लहान-मोठी पुलांची कामे करणे सुरु आहे. देव्हाडी उड्डाणपूलाच्या सुरुवातीला तुमसर- खापा-देव्हाडी असा त्रिकोणात रस्ता आहे. उड्डापूलावजळ यू-टर्न घेण्यात आला आहे. खापा मार्गाने येणाऱ्या वाहनांना देव्हाडी रेल्वे फाटक (गोंदिया) मार्ग दिसत नाही. ती वाहने देव्हाडी रेल्वे स्थानकाकडे वळविण्यात येतात. पुढे गेल्यावर चुक लक्षात येते. ती वाहने देव्हाडी अंडरपास मार्गाने रेल्वे फाटकाकडे वळवितात. अंडरपासमधून वाहने बाहेर पडतांना धोका आहे. महामार्गावरील वाहने येथून भरधाव जातात.
यू-टर्न घेतांनी वाहनांना धोक्याची शक्यता आहे. अनेक लहान-मोठे येथे वाहनांना अपघात झाले आहेत. रात्री येथे लाईटची सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे नवीन वाहन चालकांना पुढे कुठे जावे असा प्रश्न पडतो. चार रस्ते येथे असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने दूचाकी स्लिप होण्याच्या अनेक घटना येथे घडल्या. किमान रेल्वे मार्ग दर्शविणारे फलक संबंधित विभागाने येथे लावण्याची गरज आहे. राष्टÑीय महामार्गाचे काम खापा रस्त्यावर हाकेच्या अंतरावर सुरु आहे. वाहनचालकांची रात्री तारांबळ उडते. यू-टर्न रस्ता बांधकाम करतांनी किमान पलीकडे जाताना दिशा निर्देशक फलक लावण्याची गरज होती. स्थापत्य अभियंत्यांनी यु-टर्न रस्त्याला मंजूरी कशी दिली. हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
यू-टर्न नंतर उड्डाणपूल पोचमार्ग खड्डेमय आहे. त्यामुळे वाहनचालकांना येथे वाहने चालवितांनी तारेवरची कसरत करावी लागते. अनेक नियम व कायदे असतांना त्याची अंमलबजावणी कुणी करावी असा प्रश्न येथे पडला आहे. प्रशासनात केवळ कागदी घोडे नाचवली जातात काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

देव्हाडी येथील उड्डाणपूल प्रवेशमार्ग यू-टर्न आहे. चार रस्त्याची गर्दी असून रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता सहजासहजी दिसत नाही. यू-टर्न रस्त्याला मंजुरी देतांनी तांत्रिक बाबी तपासणी करणे गरजेचे होते. किमान येथे रात्री लाईटची व्यवस्था करुन रस्त्याचे फलक लावण्याची गरज आहे.
- विपील कुंभारे, महासचिव
भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी तुमसर

Web Title: 'U-turn' dangerous on the Devadi National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.