मुख्याध्यापकाच्या अटकेसाठी 'अल्टीमेटम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:11 PM2018-04-25T22:11:44+5:302018-04-25T22:11:44+5:30

सहाव्या वर्गात शिकणाºया विद्यार्थीनींना मोबाईलद्वारे अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करणाºया वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापकाचे निलंबन व अटकेसाठी तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे.

'Ultimatum' for headmistress arrest | मुख्याध्यापकाच्या अटकेसाठी 'अल्टीमेटम'

मुख्याध्यापकाच्या अटकेसाठी 'अल्टीमेटम'

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन : अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन, शिक्षण सभापतींची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सहाव्या वर्गात शिकणाºया विद्यार्थीनींना मोबाईलद्वारे अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करणाºया वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापकाचे निलंबन व अटकेसाठी तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. गोबरवाही पोलिसांना त्या मुख्याध्यापकाच्या अटकेसाठी २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अटक न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रसतर्फे पोलिस ठाण्यावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तालुक्यातील गोबरवाही येथे मथराप्रसाद ईसरका जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इय्यता सहावीचे वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक विजय दयाराम साठवणे हा मागील अनेक दिवसांपासून चिमुकल्या विद्यार्थीनींना मोबाईलमध्ये अश्लील चित्रपट दाखवून विद्यार्थीनींशी वर्गातच अश्लिल चाळे करत असल्याची तक्रार मुलींनी त्यांच्या पालकांकडे ९ एप्रिल रोजी केली असता पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीकडे धाव घेतली. त्यानुसार गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाºयांकडे दुसºया दिवसीच तक्रार दिली. त्यानुसार गटशिक्षणाधिकाºयांनी मौका तपासणी व सखोल चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या शिक्षकावर निलंबनसंबंधीचे अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालक संतुष्ट झाले होते. मात्र चौकशीच्या दहा बारा दिवसानंतरही सदर मुख्याध्यापकावर कोणतीच कारवाई न करता फेर तपासणी चौकशीसाठी सहायक बीडीओ शाळेत दाखल झाले. त्यामुळे अधिकारी राजकीय दबावापोटी मुख्याध्यापकाला वाचविण्याचा प्रयत्न करित असल्याचे लक्षात येताच प्रकरणाला वाच्चता मिळाली. लगेच दुसºया दिवसी सर्वप्रथम 'लोकमत'मध्ये बातमी झळकताच २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी शाळेला भेट देवून प्रकरणाची माहिती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना त्या मुख्याध्यापकाचे निलंबन करण्यासंबंधीचे आदेश दिले असून उद्यापर्यंत निलंबनाचे आदेश पंचायत समितीकडे येणार असल्याची माहिती तुरकर यांनी दिली आहे. त्या मुख्याध्यापकाचे निलंबन ही शिक्षा नसून त्याला अटक करा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षा कल्याणी भुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने लावून धरत गोबरवाही पोलिसांना २४ तासाचा अल्टीमेटम दिला. अन्यथा हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीच चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. शिष्टमंडळात कल्याणी भुरे, जिल्हा परिषद सदस्या संगिता सोनवाने, शाळा व्यवस्थापन समितीचे पायल लोणारकर, दिलीप सोनवाने, ईसराईल शेख, किशोर हुमणे, वामन गाढवे, लक्ष्मी हातझाडे, मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर मुख्याध्यापक हा विकृत मनोवृत्तीचा आहे. यापूर्वी लाखांदूर, लाखनीमध्ये कार्यरत असताना विद्यार्थीनीशी असेच अश्लील चाळे केले असल्याचे सामोर आले आहे. त्यामुळे केवळ निलंबन हा पर्याय नसून त्याला अटक होवून कठोर शिक्षा व्हावी.
-कल्याणी भुरे, जिल्हाध्यक्षा,महिला राष्ट्रवादी काँग्रेस.
शिक्षणाचे धडे गिरविणाºया शिक्षकाकडूनच असले कृत्य म्हणजे संपूर्ण शिक्षण विभागाला काळीमा फासल्यासारखे आहे. अशा शिक्षकांची कुठलीही गय न करता तात्काळ कारवाई करण्यात येईल.
-धनेंद्र तुरकर, शिक्षण सभापती, जि.प. भंडारा.

Web Title: 'Ultimatum' for headmistress arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.