तुमसर नगर परिषद सभापतींची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:40 PM2019-02-16T21:40:27+5:302019-02-16T21:40:55+5:30
नगरपरिषदच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वप्रथम जम्मू काश्मीर इथल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या भयंकर हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षणकर्त्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर नगरपरिषदेत निवडणूक बिनविरोध पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर: नगरपरिषदच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वप्रथम जम्मू काश्मीर इथल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या भयंकर हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षणकर्त्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर नगरपरिषदेत निवडणूक बिनविरोध पार पडली. याकरिता नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी प्रयत्न केले.
तुमसर नगर परिषदेची कारकीर्द सांभाळत भाजपला २ वर्ष पूर्ण झाली. त्यात तिसऱ्यांदा सभापती पदाची निवडणूक तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी गजेंद्र बालपांडे, मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या निवडणुकीत एकूण ६ समित्यांचे सभापती निवडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग सभापतीपदी शामकुमार धुर्वे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी रजनीश लांजेवार, महिला व बालविकास समिती सभापती शिला डोये तसेच उपसभापतीपदी भारती धार्मिक, शिक्षण सभापतीपदी छाया मलेवार, नियोजन आणि विकास सभापतीपदी अर्चना भुरे तसेच स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी कंचन कोडवानी यांची सवार्नूमते निवड करण्यात आली आणि स्थायी समितीवर नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, अमर रगडे, नगरसेविका गीता कोंडेवार यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कंचन कोडवानी, नगरसेवक सचिन बोपचे, राजू गायधने, कैलास पडोळे, किशोर भवसागर, सुनील पारधी, पंकज बालपांडे, प्रमोद घरडे, राजेश ठाकूर, शेख सलाम तुरक, नगरसेविका किरणदेवी जोशी, वर्षा लांजेवार, ताराबाई गभने, विद्याताई फुलेकर, खुशलता गजभिये, स्मिता बोरकर उपस्थित होते.