चांदपूरच्या जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय

By admin | Published: February 4, 2016 12:34 AM2016-02-04T00:34:51+5:302016-02-04T00:34:51+5:30

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात असलेल्या विस्तीर्ण जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे.

Unauthorized boat trading in the reservoir of Chandpur | चांदपूरच्या जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय

चांदपूरच्या जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय

Next

संस्था अध्यक्षांचा प्रताप : पर्यटकांचे जीव धोक्यात, पाटबंधारे विभाग निद्रिस्त
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात असलेल्या विस्तीर्ण जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे. मत्स्यपालन संस्थेच्या अध्यक्षांनी या व्यवसायाची सुरुवात केल्याची माहिती मिळाली असून पर्यटकांचे जीव धोक्यात आले आहे. यात पाटबंधारे विभागाची भूमिका खटकणारी असल्याचे आरोप होत आहेत.
सिहोरा परिसरातील ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाची जिल्ह्यात नंदनवन म्हणून ओळख आहे. या पर्यटनस्थळाला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. गेल्या आॅगस्ट २०१२ पासून पर्यटनस्थळ बंद करण्यात आला आहे. या पर्यटनस्थळावरून कंत्राटदारांचे नियंत्रण संपताच अनधिकृत व्यवसाय धारकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पर्यटनस्थळात असणाऱ्या ३२८ हेक्टर आर जागेतील विस्तीर्ण जलाशयात वर्षभर पाणी राहत आहे. या जलाशयात आधी बोटिंग व्यवसायाची मंजुरी कंत्राटदाराला देण्यात आली होती. जलाशयातील बोटिंग पर्यटकांना भुरळ घालणारी होती. परंतु पर्यटनाची लिज संपताच बोटिंग व्यवसाय बंद करण्यात आलेला आहे. तर बोटिंग साहित्याची नासधूस झाली आहे. परंतु पर्यटनस्थळ बंद झाले असतानाही पर्यटकाची हजेरी पर्यटनस्थळात सुरुच आहे. याच संधीचे सोने करण्यासाठी जलाशयात अनधिकृत बोटींग व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे. या व्यवसायाकरिता २ लाख खर्चून नागपूरहून डोंगा खरेदी करण्यात आलेला आहे. या डोंग्यात डिझेल इंजिन लावण्यात आलेला आहे. प्रती व्यक्ती ३० रुपये प्रमाणे बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. ३५ फूट खोल या जलाशयात अप्रशिक्षित तरुण पर्यटकांची भ्रमंती करीत आहेत. रोज १००-१५० पर्यटक या बोटिंग मध्ये जलाशयात भ्रमंती करीत असल्याने पर्यटकांचे जीव धोक्यात आले. गेल्या सहा महिन्यापासून भरदिवसा हा अनधिकृत व्यवसाय सुरु असताना नियंत्रण ठेवणाऱ्या पाटबंधारे विभागाची भूमिका खटकणारी आहो. या व्यवसायात नागपूरचे काही व्यवसायीक गुंतले असल्याची माहिती मिळाली आहे.
या जलाशयात मासोळी उत्पादनाला मंजुरी देण्यात आली असून चांदपूरच्या मागासवर्गीय मत्स्यपालन सहकारी संस्थेला लिजवर देण्यात आले आहे. या संस्थेच्या अध्यक्षांनी अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायात ३-४ अस्थायी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान जलाशयात सुरु असलेल्या या जीवघेण्या बोटिंग व्यवसायाची माहिती मिळताच संस्था अध्यक्षांना पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व अन्य कर्मचाऱ्यांनी चांगलेच खडसावले आहे. जलाशयात अनधिकृत व्यवसाय व बोटिंग व्यवसायाला बंदी असताना नियम झुगारण्यात येत आहे. हा व्यवसाय बंद करण्यासाठी या आशयाची संस्था अध्यक्षांना नोटीस बजाविण्यात आली आहे. परंतु नोटीसाला पायदळी तुडविण्यात आले आहे. मासेमारी करण्यासाठी जलाशयात डोंगा भ्रमंतीला मंजुरी असली तरी बोटिंग व्यवसायासाठी डोंगा हायटेक करण्यात आल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाने आठवडाभर कर्मचारी जलाशयात परिसरात नियुक्त केले आहे. काही दिवस बोटिंग व्यवसाय बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे कमतरतेचे कारण पुढे करून कर्मचाऱ्याचे नियंत्रण हटविण्यात आले आहे. यामुळे पुन्हा बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. रोज ५०-६० पर्यटक या बोटिंग मध्ये जलाशयात भ्रमंती करीत आहे. शासन स्तरावर मंजुरी नसताना राजरोसपणे पर्यटकांना जलाशयात भ्रमंती केली जात आहे. या आधी जलाशयात प्राणहानी झाली आहे. अनेकांचा बुडून मृत्यू झाला. परंतु अनधिकृत बोटिंग व्यवसायावर बंदी घालण्यात आली नाही. अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु असताना डोंगा जप्तीची कारवाई झाली नाही. यामुळे पाटबंधारे विभागाची भूमिका खटकणारी असल्याचे दिसून येत आहे. या जलाशयात कर्मचारी हजेरी लावण्याचे कळताच जलाशयात अन्य भागांकडे डोंगा वळता करण्यात येत आहे. मासोळी उत्पादन व मासेमारी करण्याचे अधिकार असताना संस्था अध्यक्षांनी बोटिंग व्यवसाय थाटला आहे. या शिवाय जलाशयात पर्यटकांच्या जीवाचा खेळ मांडला आहे. यामुळे या व्यवसायासह पाटबंधारे विभागाची यंत्रणा अडचणीत आली आहे. साटेलोटे असल्याचे आरोप होत आहे. अनधिकृत बोटिंग व्यवसाय बंद करण्याची मागणी आहे.

जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास येताच संस्था अध्यक्ष यांना जबाबदार धरण्यात आले असून व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.
- वाईन देशकर, शाखा अभियंता, डावा कालवा पाटबंधारे विभाग सिहोरा.
बोटिंग व्यवसायासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला असून पर्यटकांच्या आग्रहास्तव जलाशयात डोंग्यातून भ्रमंती करण्यात येत आहे.
- शांताराम शहारे, अध्यक्ष मत्सपालन संस्था चांदपूर.

Web Title: Unauthorized boat trading in the reservoir of Chandpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.