चांदपूर जलाशयात विनापरवानाधारकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:31 PM2018-12-23T22:31:20+5:302018-12-23T22:32:14+5:30
चांचांदपूर जलाशयात मत्स्यपालन विभागाने मासेमारी करण्याचे परवाने दिले असले तरी, यापेक्षा अधिक नागपूर, भंडारातील व्यापाऱ्यांच्या एंजटकरवी विना परवाना धारकाकडून मासेमारीचा जमावडा आहे. जलाशयात खुलेआम मासोळ्यांची चोरी करण्यात येत असतांना मत्स्यपालन विभाग बेखबर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा): चांचांदपूर जलाशयात मत्स्यपालन विभागाने मासेमारी करण्याचे परवाने दिले असले तरी, यापेक्षा अधिक नागपूर, भंडारातील व्यापाऱ्यांच्या एंजटकरवी विना परवाना धारकाकडून मासेमारीचा जमावडा आहे. जलाशयात खुलेआम मासोळ्यांची चोरी करण्यात येत असतांना मत्स्यपालन विभाग बेखबर आहे.
यंदा मार्च २०१८ मध्ये जलाशयात मत्स्यपालन व मासेमारी करण्याची मुदत संपली आहे. मत्स्यपालन संस्थेच्या ताब्यात असणारी जलाशयातील मासेमारी मत्स्यपालन विभागाचे नियंत्रणात आली आहे. राज्य शासनाने नविन विविध योजनांअंतर्गत जलाशयातील मत्स्यपालन आणि मासेमारी करण्याचे कंत्राट प्रक्रियेला अद्याप मंजुरी दिली नाही. यामुळे गाव स्तरावरील मत्स्यपालन संस्थाचे रोजगार गडगडले आहे. चांदपूर जलाशयात असणारे नियंत्रण नसल्याने मासेमारी करण्याची प्रक्रिया मत्स्यपालन विभागाने सुरु केली आहे. मासेमारांना महिनाभराचे परवाने वितरीत करण्यात आली आहेत. ५०० रुपये दरात मासेमारांना रोजगार उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागात मासेमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मासेमारीतून उदरनिर्वाहाचा साधन मिळाला आहे. जलाशयात परवाना धारकांनाच मासेमारीची मंजुरी मिळाली असून त्यांनीच जलशयात जाळे घालण्याची अधिकृत मंजुरी आहे. परंतु सध्या जलाशयात विना परवानाधारक मासेमाराचा जमावडा तयार झाला आहे. नागपूर, भंडाराच्या व्यापाºयांनी या जलाशयात धुडगुस सुरु केला आहे. त्यांचे एजंट या जलाशयात सक्रीय झाली आहे. परवानाधारकांच्या नावावर विना परवानाधारक मासोळयाची चोरी करीत आहेत. या जलाशयातील मासोळयाची विक्री व्यापाºयाना करण्यात येत आहेत. या जलाशयात मत्स्यपालन विभागाचे नियंत्रण असले तरी, २४ तास नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. यामुळे व्यापारी मालामाल होतांना दिसत आहे. मत्स्यपालन विभाग परवाने प्राप्त मासेमार या जलाशयात मासेमारी करीत असल्याचे सांगत असले तरी, विना परवानाधारक मासोळयाची चोरी करीत असल्याचे नाकारत नाही. यामुळे जलाशयात आलबेल प्रकार सुरु आहेत.
स्थानिकांना रोजगार आणि उदरनिर्वाह करणाºयासाठी परवाना देण्याचा निर्णय विभागाने घेतला असला तरी व्यापाºयाचे एजंट अधिक विना परवान्याने मासेमारी करित असल्याचे कुणी नाकारत नाही. दरम्यान जलाशयात बेधडक मासेमारीचे प्रकार सुरु आहेत. परंतु नव्याने मत्स्यापालन करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. यामुळे येत्या काही महिन्यात मासेमारी अडचणीत येणार आहे.
या संस्थेकडे जलाशयात मासेमारी आणि मत्स्यपालनाचे कंत्राट होते. या संस्थेचे २०० हून अधिक सभासद आहेत. परंतु संस्थेचे कंत्राट मुदत संपल्याने या सभासदाचे उदरनिर्वाह अडचणीत सापडले आहे. त्यांचा रोजगार हिरावला आहे. भलत्याच व्यापाऱ्यांचे अधिकारया जलाशयात निर्माण झाले आहे. मत्स्यपालन आणि मासेमारीचे कंत्राट देणारी प्रक्रिया खोळबंल्याने स्थानिकांवर अन्याय सुरु झाला आहे. या जलशयाचे मासेमारीत मत्स्यपालन विभाग सर्वेसर्वा आहे. यामुळे या विभागला नियंत्रण ठेवतांना अडचणीचे ठरत आहे. या जलाशयात कुणीही या आणि मासेमारी करा, असे चित्र निर्माण झाले आहे.