मंदीमुळे रेतीचा डम्पिंग यार्डमध्ये अनधिकृत साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:01 PM2018-12-28T22:01:31+5:302018-12-28T22:01:50+5:30

सिहोरा परिसरातील वैनगंगा, बावनथडी नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात अनधिकृत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहेत. कर्कापूर गावाचे शिवारात सर्वाधिक रेती खाजगी जागेत असताना यंत्रणेची कारवाई शून्य आहे.

Unauthorized storage in sand dumping yards due to recession | मंदीमुळे रेतीचा डम्पिंग यार्डमध्ये अनधिकृत साठा

मंदीमुळे रेतीचा डम्पिंग यार्डमध्ये अनधिकृत साठा

Next
ठळक मुद्देरेती विक्री अडली : खाजगी व शासकीय जागेत डम्पिंग, खाजगी जमीनधारकांवर गुन्हे नोंदवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील वैनगंगा, बावनथडी नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात अनधिकृत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहेत. कर्कापूर गावाचे शिवारात सर्वाधिक रेती खाजगी जागेत असताना यंत्रणेची कारवाई शून्य आहे.
सिहोरा परिसरातील वैनगंगा, बावनथडी नद्यांचे खोºयात पात्रातून अवाठव्य रेतीचा उपसा सुरू आहे. नागपुर, मध्यप्रदेश आणि विदर्भातील अन्य जिल्ह्यात रेतीची मोठी मागणी असल्याने नद्यांचे काठावरील गावात रेती माफियांचा उदय झाला आहे. नदीचे पात्रातून दिवस रात्र रेतीचा उपसा केल्यानंतर गावाचे शेजारी असणाºयाशेत आणि गाव शिवारात खाजगी व शासकीय जागेत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहेत.
यात वन आणि महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या व्यवसायात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय सेवेतील गाव स्तरावरील लोक रक्षक कर्मचारी आणि लहान मोठे व्यावसायिक गुंतले आहेत. अनेकांनी या व्यवसायात अधिक नफा असल्याचे कारणावरून मुळ व्यवसायाचे शटर बंद केली आहे.
नगदी पीक याप्रमाणे रेती विक्री या व्यवसायाची गणना केली जात आहे. दिवस भर रेतीचा उपसा केल्यानंतर रात्री या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावर दिवस भर बोटावर मोजण्या इतपत ट्रक धावत असली तरी रात्री या ट्रकची गर्दी दिसत आहे. हरदोली गावाचे बस स्थानकावर राज्य मार्गावर रेतीची प्रतिक्षा करित असताना सायंकाळ सुमारास ७ ते ८ ट्रक रोज दिसून येत आहेत.
या बस स्थानकावर रेतीचे माफिया या ट्रकची प्रतिक्षा करित आहेत. कर्कापूर गावाचे शिवारात या ट्रकला वळते करण्यात येत आहे. या दोन गावांचे शिवारात डम्पींग यार्डमध्ये ५०० ट्रक हून अधिक रेती आहे.
खाजगी जागेत असणाºया या रेतीचे साठ्यावर जप्तीची कारवाई येत नाही. या शिवाय खाजगी जमीन धारकांचे विरोधात कारवाई केली जात नाही. पांजरा गावाचे घाटावरून ही रेती डम्पींगमध्ये आयात करण्यात येत आहे.
दरम्यान नजिकचे राज्यात विधानसभा निवडणुकीने विदर्भातील बांधकाम प्रभावित झाले आहे. मजुर वर्गाने गावाकडे पलायन केल्याने रेती विक्रीवर बंदी आली असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नद्यांचे काठावरील गावे आणि शेजारी गावात रेतीचे ढीग दिसून येत आहेत. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर ओव्हरलोडेड रेतीचे ट्रक धावत आहेत.
आधीच राज्य मार्ग खड्डेमय झाला आहे. पुन्हा या ट्रकनी यात भर घातली आहे. ओव्हरलोडेड ट्रकमुळे डबल धमाका लाभाचे चित्र माफियांना होत आहे. परंतु कारवाईचे नावावर आलबेल सुरू आहे.

Web Title: Unauthorized storage in sand dumping yards due to recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.