दप्तरविरहित दिन साजरा
By Admin | Published: January 4, 2016 12:35 AM2016-01-04T00:35:27+5:302016-01-04T00:35:27+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वाचन आनंद कार्यक्रमांतर्गत दप्तर विरहित दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
जि.प. शाळा : पुस्तकांबाबत चिमुकल्यांनी केले मत व्यक्त
पांढरी : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वाचन आनंद कार्यक्रमांतर्गत दप्तर विरहित दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांना ग्रंथापासून तर उपयुक्त पुस्तके वाचनासाठी देण्यात आलेल्या होत्या. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्सुकतेने वाचन आनंद कार्यक्रमात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी बराच वेळ अध्यापन करण्यामध्ये घालविला व त्यानंतर शिक्षकांनी त्यांना वाचन केलेल्या पुस्तकांविषयी विचारणा केली. याप्रसंगी चिमुकल्यांनी त्याविषयी आपले मत सर्वांसमोर प्रकट केले.
पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे याबद्दल कौतुक केले. शाळेतर्फे उत्कृष्ट वाचक स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा व आवड निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश होता. उत्कृष्ट वाचक व मनोगत विचार व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे पारितोषिके देण्यात आले. त्यामध्ये वर्ग सहावीची कांचन कटरे, रुपाली शरणागत, सुनैना बिसेन, तपेश शरणागत, निशिकांत ठलाल, वर्ग पाचवीचा जियानी तोंडफाडे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद वाघाडे, भोजराज खंडेलवाल, ग्रामपंचायत सदस्य आशा पटले, जितेंद्र चन्ने, मुख्याध्यापक डी.आय. कटरे, के.एम. बिसेन, राऊत, एस.जी. किरणापुरे, सूर्यवंशी, चाचेरे, ए.जी. देशमुख, परशुरामकर उपस्थित होते. (वार्ताहर)