अनियंत्रित ट्रॅक्टरची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:56 PM2018-03-16T21:56:20+5:302018-03-16T21:56:20+5:30
भंडाराकडून भरधाव वेगाने खमारीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात मुंढरी (बुज) येथील दुचाकीचालक व मागे बसलेली त्याची पत्नी व मुलगा गंभीररित्या जखमी झाले.
आॅनलाईन लोकमत
करडी (पालोरा) : भंडाराकडून भरधाव वेगाने खमारीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात मुंढरी (बुज) येथील दुचाकीचालक व मागे बसलेली त्याची पत्नी व मुलगा गंभीररित्या जखमी झाले. ही घटना शुक्रवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास भिलेवाडा ते खडकी मार्गावर बेरोडी पेट्रोलपंपजवळ घडली.
भुमेश्वर महादेव हेडाऊ (४७), पत्नी कल्पना हेडाऊ (४३) व मुलगा यश (११) रा.मुंढरी (बुज) अशी जखमींची नावे आहेत. जखमी कल्पना व यशला भंडारा येथे खाजगी रूग्णालयात तर भुमेश्वरला नागपूर येथे हलविण्यात आले.
भुमेश्वर हे पत्नी व मुलासह मुंढरी येथून भंडाराकडे जात होते. दरम्यान बेरोडी पेट्रोलपंपजवळ विरूद्ध दिशेने येणारा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३६ एल ५३१०) च्या चालकाचे भरधाव ट्रॅक्टरवरून अनियंत्रित सुटल्याने दुचाकीला धडक दिली. यात कल्पना यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली तर यशचा पाय तुटला.
अपघाताची माहिती होताच बरोडी, नेरोडी, सुरेवाडा या मार्गाने प्रवास करणाºया नागरिकांनी घटनास्थळावर रस्ता अर्धा तास रोखून धरला. याची माहिती होताच कारधााचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, उपनिरीक्षक लाडे हे घटनास्थळी पोहोचले. कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांनी मार्ग मोकळा केला. हा ट्रॅक्टर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारी रेती रिकामी करून खमारीकडे जात होता. या प्रकरणाचा तपास कारधा पोलीस करीत आहेत.