मुख्याधिकारी कर्तव्याच्या ओझ्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:17 AM2021-09-02T05:17:09+5:302021-09-02T05:17:09+5:30
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहणे ही काही नवीन बाब नाही. मात्र, एका अधिकाऱ्याकडे किती प्रभार द्यावा, ...
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहणे ही काही नवीन बाब नाही. मात्र, एका अधिकाऱ्याकडे किती प्रभार द्यावा, याचीही काही सीमा असावी. असे असले तरी शासनाला याचे सोयरसुतक वाटत नसावे, असेच दिसून येत आहे. भंडारा तुमसर व पवनी येथे असलेल्या नगर परिषदेतील मुख्याधिकारी पदाचा कारभार एका मुख्याधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. भंडाराचे मुख्याधिकारी विनोद जाधव हे असून त्यांच्याकडे आधी तुमसर व त्यानंतर आता पवनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आठवड्यातील सहा दिवसांत कोणती जबाबदारी सांभाळावी, यात ते प्रचंड तणावात दिसून येतात. तीन-तीन पालिकेची जबाबदारी सांभाळताना मुख्याधिकाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. सकाळी भंडारा तर दुपारच्या सुमारास तुमसरात हजेरी लावत असतात. असाच अनुक्रम पवनीबाबतही ते करीत आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले तर बरे होईल, असे नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे म्हणणे आहे.