निर्माणाधीन बांधकामाने केली रोपवाटिकेची माती
By Admin | Published: October 10, 2015 01:09 AM2015-10-10T01:09:55+5:302015-10-10T01:09:55+5:30
पंचायत समिती आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका आहे. त्या लगतच महिला बचत गट विक्री केंद्राची इमारत बांधण्याची परवानगी ...
तुमसर : पंचायत समिती आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका आहे. त्या लगतच महिला बचत गट विक्री केंद्राची इमारत बांधण्याची परवानगी मिळताच कंत्राटदाराने जमिनीचे खोदकाम करून त्यातील मलमा रोपवाटीकेत टाकल्याने लक्षावधी रूपयांचे झाडे जमिनीत गाठल्या जावून तिथली रोपवाटिका दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारावर गुन्हा नोंदविण्याची मागणीचा ठराव मासिक सभेत घेतला गेला.
पंचायत समिती तुमसरच्या आवारात मागच्या बाजूला ग्रामपंचायत मांगलीतर्फे एमआरईजीएस अंतर्गत तीन लक्ष रूपये खर्चून ही सन २०१२-१३ मध्ये करण्यात आला. महिला बचत गट विक्री केंद्राच्या इमारतीला मंजुरी प्राप्त झाली.
सदर इमारतीचे ही २० बाय १० मीटर इतकेच बांधकाम करावयाचे असल्याने कमी वेळात जास्त पैसा कमविण्याच्या नादात सदर कंत्राटदाराने जमिनीचे खोदकाम मशीनद्वारे उरकून घेऊन जमिनीतील मलमा त्याने रोपवाटिकेत टाकल्याने संपूर्ण रोपवाटिकेतील झाडे मातीत दाबले जाऊन पूर्णत: वृक्ष तसेच रोपवाटीका उद्वस्त झाली. लक्षावधी रूपये लावून लावलेली रोपवाटिका मातीत गेली. त्यामुळे पर्यावरणाचेही नुकसान झाले आहे. (शहर प्रतिनिधी)