नियमाला डावलून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:10 AM2018-01-19T00:10:29+5:302018-01-19T00:10:49+5:30
देवनारा रेती घाटातून केवळ १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत ७०० ते ८०० ब्रास रेती उत्खनन करण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत रेती उत्खनन सुरू राहणार आहे.सध्या नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देवनारा रेती घाटातून केवळ १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत ७०० ते ८०० ब्रास रेती उत्खनन करण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत रेती उत्खनन सुरू राहणार आहे.सध्या नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे रेती उत्खनन नियमाला येथे डावलले जात आहे.
४ जानेवारी २०१८ च्या जीआरनुसार ३ हजार ब्रासपर्यंतच्या परिणामाच्या रेतीघाटाचे लिलाव ३ महिने राहणार आहे. देवणारा रेतीघाट मागील वर्षी लिलाव झाल्याने येथे महसूल व खनिकर्म विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
तुमसर तालुक्यातील देवनारा रेती घाट सन २०१७ मध्ये लिलाव करण्यात आला होता. नदीपात्रात रेतीसाठा कमी असल्याने खनिकर्म विभागाने केवळ १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी येथे दिली होती. त्या अनुषंगाने महसूल विभागाने रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविली. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर बावनथडी नदी आहे.
नदी पात्रात दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित केल्या आहेत. खनिकर्म विभागाने तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी दिली. रेती उत्खननामुळे नदी पात्रात खड्डे पडले दगड दिसत आहेत.
देवनारा येथील रेतीघाटावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल. तसा अहवाल तयार करण्यात येईल. रेती उत्खनन करण्याचे नियम आहेत. त्याची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येईल. जिल्हा खनिकर्म अधिकाºयांशी याबाबत माझी चर्चा झाली आहे.
-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.