तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:12 AM2019-09-05T01:12:30+5:302019-09-05T01:13:19+5:30

पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Under the Tumsar-Gondia National Highway | तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

Next
ठळक मुद्देवाहतूक बंद : देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फूट पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फुट पाणी वाहत होते. पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या रखडले आहे.
तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा घोषीत करण्यात आला.
सदर रस्त्याचे सीमेंट काँक्रीटचे कामे सुरु आहेत. कामाची गती मंद आहे. देव्हाडी शिवारात पुल भूईसपाट करून नवीन पुल बांधण्यात आले. जुन्या रपट्यातून बायपास रस्ता तयार करण्यात आला. रपट्याखालून सिमेंट पाईप घालण्यात आले. एकाच पाईपमधून पाणी गतीने जात नाही. त्यामुळे रपट्यावर सुमारे दोन फुट पाणी वाहत आहे.
पुलाचे बांधकाम झाल्यानंतर दोन्ही बाजूला मुरुमाचे भराव करण्यात आले नाही. मातीमिश्रीत मुरुम काही प्रमाणात घालण्यात आले. त्यामुळे अप्रोच रस्ता मातीमाप झाला आहे.
या रस्त्यावरून दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. सकाळी ९ ते ९.३० दरम्यान एसटी बसगाड्या रपट्यातील पाण्यातून नेण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या बंद आहे. त्याचा फटका वाहतुकदारांना बसत आहे.
एमआयडीसीत शिरले पाणी
तुमसर-गोंदिया मार्गावर रपट्याजवळच एमआयडीसी आहे. पुलाखालून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने नाला फुगून त्याचे पाणी एमआयडीसीत शिरले आहे. सध्या एमआसयडीसीतील रस्ते जलमय झाले आहेत. नियोजनाचा अभाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिसत आहैे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची वाट लागली असून राष्ट्रीय महामार्ग धोकादायक ठरत असल्याचा आरोप डॉ.पंकज कारेमोरे यांनी लावला आहे. अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही डॉ.कारेमोरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Under the Tumsar-Gondia National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.