अंडरग्राऊंड पुलाचे काम थंडबस्त्यात

By admin | Published: April 18, 2015 12:25 AM2015-04-18T00:25:08+5:302015-04-18T00:25:08+5:30

रिसामाजवळील स्थानकाला लागून असलेल्या रेल्वे फाटकाचा परिसरातील शेतकऱ्यांना फटका नेहमीच बसत आहे.

Underground bridge work in the cold storage | अंडरग्राऊंड पुलाचे काम थंडबस्त्यात

अंडरग्राऊंड पुलाचे काम थंडबस्त्यात

Next

रिसामा रेल्वे फाटक : रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका
आमगाव : रिसामाजवळील स्थानकाला लागून असलेल्या रेल्वे फाटकाचा परिसरातील शेतकऱ्यांना फटका नेहमीच बसत आहे. शेतातील धान, तनस व इतर खरीप, रबीचे पीक रेल्वे फाटकावरुन बैलबंडी किंवा ट्रॅक्टरने आणताना रेल्वे गेट बंद असतो. सततच्या पाठपुराव्यानंतर १२ जुलै २०१२ रोजी सदर फाटकाला अंडर ग्राऊंड पूल मंजूर करण्यात आले. मात्र सदर पुलाचे काम थंडबस्त्यात पडले आहे. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना याचा सतत फटका बसत असून सदर काम त्वरित सुरू करण्याची मागणी शामराव बहेकार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
रिसामा येथील शेतकऱ्यांची मोठी गंभीर समस्या रेल्वे फाटक आहे. नेहमीच रेल्वे गाड्यांचे येणे-जाणे सुरू असते. त्यामुळे अनेकदा फाटक बंद असतो. फाटक उंचावर असल्यामुळे बैलबंडीला तसेच ट्रॅक्टर नेताना मोठी कसरत करावी लागते. कधी बैलबंडी फाटक उंच असल्याने मागे सरकते व संतुलन बिघडून खाली भागात जाते. बैलाचे, बंडी व बंडीवर असलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तिच स्थिती ट्रॅक्टरची आहे. ब्रेक न लागल्यास ट्रॅक्टर मागे जातो. अशा अनेक घटना या रेल्वेफाटकावर घडलेल्या आहेत.
या रेल्वे फाटकाचा क्रमांक-४९७८ असा आहे. दक्षिण-पूर्व रेल्वे नागपूर येथील वरिष्ठ मंडल अधिकारी अभियंता यांनी १२ जुलै २०१२ च्या संदर्भ पत्रात सहायक जनसूचना अधिकारी पत्राचा (सं.का/नाग/सेल/जसूअ ०५/०६/१२श्या तु.ब./२०३ दि. २८/०६/२०१२) संदर्भा देऊन माहिती मागितली. त्यात गेट क्रमांक-४९७८ वरिष्ठ अभियंत्याला सदर अंडर ग्राऊंड चौकी मंजूर झाली का? तसेच जिल्हाधिकारी यांचे नाहरकरत प्रमाणपत्र पाठविण्याची विनंती मंजूर झाली.
सदर कामाचे कॉन्ट्रक्ट झाले का? किती उंच व रुंद आहे. एकूण खर्च किती, सन २००८ पासून सतत मागणीकरिता शेतकरी प्रयत्नशील आहे, अशा प्रकारची विचारणा करण्यात आली. दक्षिण पूर्व मध्य मंडळ नागपूरचे वरिष्ठ मंडळ अभियंता यांनी गेट क्रमांक-४९७८ चे काम मंजूर झाले.
कामावर जवळपास एक कोटी, ११ लाख, १० हजार २९२ रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर कामाची निविदा २० जून २०१२ रोजी उघडण्यात आली व मंजूर निविदा विचाराधिन आहे. सदर अंडर ग्राऊंड पुलाची रुंदी ४.२० मीटर व उंची ३.६० मीटर असल्याचे पत्र देण्यात आले. मात्र चार वर्षापासून मंजूर झालेले काम सुरू करण्यात आले नाही. सदर रेल्वे चौकीवर अंडर ग्राऊंड पुलाचे काम त्वरित करण्याची मागणी शामराव बहेकार, संजू बहेकार व शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Underground bridge work in the cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.