पोलिसांची कार्यप्रणाली समजून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:05 AM2018-01-05T01:05:11+5:302018-01-05T01:05:29+5:30
पोलीस हे नागरिकांसाठी आवश्यक आहे. नागरिक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करतात पण आम्ही त्याच दिवशी संरक्षणासाठी रस्त्यावर तैनात असतो. पोलिसांना कुंटुंबासोबत सण साजरे करण्याचा योग येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : पोलीस हे नागरिकांसाठी आवश्यक आहे. नागरिक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करतात पण आम्ही त्याच दिवशी संरक्षणासाठी रस्त्यावर तैनात असतो. पोलिसांना कुंटुंबासोबत सण साजरे करण्याचा योग येत नाही. त्यामुळे तरूण पिढीने पोलिसांची कार्यप्रणाली समजून घ्यावी, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी केले. रेडींग डे निमित्त विद्यार्थ्यासमोर व्यक्त केले.
पोलीस स्टेशन मोहाडी येथे ४ जानेवारीला रेझींग डे कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सरस्वती विद्यालय व जिल्हा परिषद विद्यालय मोहाडीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, साधारण गुन्हे याबाबद माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सेल्फ लोडींग रायफल, कार्बाईन, १२ बोर रायफल, ९ एम.एम. पिस्तूल बाबद माहिती जाणून घेतली. स्टेशन डायरी, पोलीस कोठडी, वायरलेस आॅपरेटींग, संगणक कक्षाचे सुद्धा अवलोकन केले. शस्त्राबद्यलची माहिती पोलीस शिपाई हुकूमचंद आगाशे यांनी दिली. संचालन पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन संजय वाकलकर यांनी केले. पोलीस शिपाई आशिष तिवाडे, शिक्षक बळीराम भोंगाडे, जनार्दन नागपुरे, चुडामन हटवार, प्रमोद घमे, तुफानसिंग चौहाण, प्रकाश निमजे, शिक्षिका पूजा बांगडकर, जयश्री सेलोकर, सुषमा राघोर्ते, शुषमा वंजारी, यशवंत थोटे व विद्याथी-विद्यार्थिनी उपस्थित होते.