समाजशास्त्रीय संकल्पना व सिद्धांत समजून घेणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:00 PM2018-03-12T23:00:39+5:302018-03-12T23:00:39+5:30

समाजपातळीवर झपाट्याने होत असलेले बदल सर्वांच्याच कुतुहलाचा विषय आहे. या पार्श्वभूमिवर समाजशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन फार गांभीर्याने करावे लागणार आहे.

Understanding sociological concepts and principles is important | समाजशास्त्रीय संकल्पना व सिद्धांत समजून घेणे महत्त्वाचे

समाजशास्त्रीय संकल्पना व सिद्धांत समजून घेणे महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देअजयकुमार मोहबंसी : पेट्रोलपंप जवाहरनगर येथे समाजशास्त्र विषयाची कार्यशाळा

आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : समाजपातळीवर झपाट्याने होत असलेले बदल सर्वांच्याच कुतुहलाचा विषय आहे. या पार्श्वभूमिवर समाजशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन फार गांभीर्याने करावे लागणार आहे. त्यामुळे समाजशास्त्रीय नव संज्ञा संकल्पना व सिद्धांत नीट समजून घेणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंसी यांनी केले.
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय, पेट्रोलपंप जवाहरनगर येथील समाजशास्त्र विभाग व रातुम नागपूर विद्यापीठ नागपुरच्या संयुक्त विद्यमाने कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय, पेट्रोलपंप जवाहरनगर येथे समाजशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तर सेमिस्टरनिहाय अभ्यासक्रम लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. बी.के. स्वाईन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसरचे सचिव डॉ. जी.डी. टेंभरे तर, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. संजय दुधे, प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंसी उपस्थित होते.
भारतीय समाजव्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तन होत आहे. नवनवीन सामाजिक समस्या आणि जटील आवाहन समोरे जावे लागत आहे. तेव्हा समाजशास्त्राचे अध्ययन करताना समाजाचा सर्वांगिण बदलाचे समाज परिवर्तनाच्या गतीशील वास्तव्याचे प्रखर भान ठेवणे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकाचे प्रमुख कार्य असावे, असे प्रतिपादन रातुम नागपूर विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी.के. स्वाईन यांनी केले. समाजशास्त्र विषय समाजाचा आरसा आहे, असे मत डॉ. जी.डी. टेंभरे यांनी मांडले. समाजशास्त्र नवीन अभ्यासक्रमावर रचनाबद्ध, आणि सुव्यवस्थीत व विशिष्ट निर्माण केला आहे, असे विचार डॉ. प्रदीप मेश्राम यांनी मांडले. कार्यशाळा घेणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे आहे, असे मत डॉ. संजय दुध यांनी केले. आभार डॉ जे.व्ही. कोटांगले यांनी मानले. कार्यशाळेच्या पहिल्या टेक्निकल सत्राचे अध्यक्ष डॉ. बी.के. स्वाईन होते.सत्राच्या निमित्ताने विषय तज्ज्ञानी बीए सत्र चार व पाचव्या नवीन अभ्यासक्रमावर भाष्य केले. डॉ. अशोक बोरकर, यांनी सत्र चारच्या युनीट १ व ४ वर भाष्य केले. डॉ. धनंजय सोनटक्के यांनी सत्र चारच्या युनीट २ व ३ वर भाष्य केले. डॉ. प्रदीप मेश्राम, जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा यांनी सत्र पाचव्या युनिट १ व ३ च्या अभ्यासक्रमात भाष्य केले. डॉ. साधना लांजेवार यांनी सत्र पाचच्या युनीट २ व ४ च्या अभ्यासक्रमावर भाष्य केले. तसेच डॉ. विजयकुमार नागपूर यांनी सत्र पाचच्या युनिट ३ च्या अभ्यासक्रमावर भाष्य केले. टेक्निकल सत्र दोन मध्ये एम.ए. च्या सहाव्या सत्राच्या अभ्यासक्रमावर कार्यशाळेत विषय तज्ज्ञांनी अभ्यासक्रमासंदर्भात आकलन मांडले. त्यात डॉ. सुष्मा बांगेश्वर, हिंगणा यांनी युनिट दोनवर भाष्य केले. डॉ. सुचिता पारकर यांनी युनिट चारवर भाष्य केले, डॉ. राहुल भगत यांनी युनिट १ व ३ वर भाष्य केले. समारोपीय कार्यक्रम डॉ. बी.के. स्वाईन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. पहिल्या सत्राचे संचालन डॉ. सुरेंद्र पवार व प्रा. राखी तुरस्कर यांनी आभार मानले. दुसºया सत्राचे व समारोपीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. बबन मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंसी, कार्यशाळेचे आयोजन समिती प्रमुख डॉ. जगजीवन कोटांगले, सह समन्वयक डॉ. नलिनी बोरकर तसेच प्रा. आर.पी. बावणकर, प्रा. विजय गणवीर, प्रा. एस.आर. गोंडाणे, डॉ. आर.एन. मानकर, डॉ. आर.एम. डोहणे, डॉ. सी.पी. साखरवाडे, प्रा. देवराम डोरले, प्रा. बी.एम. दमाहे, प्रा. हरगोविंद टेंभरे, डॉ. अनिता वंजारी, डॉ. सुनिता रविदास, प्रा. पौर्णिमा रहांगडाले, प्रा. कु. कविता बडवाईक तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी ललितकुमार ठाकूर, दिपक बाळबुद्धे, के.सी. तुरकर, आर.बी. जैनवा, ए.ए. कटरे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Understanding sociological concepts and principles is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.