बनगाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन त्वरित पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:40+5:302021-07-22T04:22:40+5:30

आमगाव : रस्त्याच्या बांंधकामामुळे तुटलेली बनगाव व इतर ४७ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन त्वरित पू‌र्ववत करावी, असे निर्देश ...

Undo the pipeline of Bangaon water supply scheme immediately | बनगाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन त्वरित पूर्ववत करा

बनगाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन त्वरित पूर्ववत करा

Next

आमगाव : रस्त्याच्या बांंधकामामुळे तुटलेली बनगाव व इतर ४७ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन त्वरित पू‌र्ववत करावी, असे निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी (दि.१९) घेतलेल्या विशेष बैठकीत दिले.

देवरी ते आमगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ व आमगाव रेल्वेस्थानक ते वाघ नदी (मध्य प्रदेश) सीमेपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे बनगाव व इतर ४७ गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची मुख्य वितरक पाइपलाइन खोदकामामुळे मागील अनेक दिवसांपासून तुटून पडलेली आहे. नवीन रस्त्याच्या बांधकामामध्ये सदर पाइपलाइन बदलविणे व सुधारित करण्याचे अंदाजपत्रक समाविष्ट असल्याने ते काम संबंधित कंत्राटदार कंपनीला करणे हे बांधील असूनही संबंधित कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्याची दखल प्रशासकीय पातळीवर संबंधित कंत्राटदाराने घेतली नाही. यावर आमदार कोरोटे यांनी सोमवारी (दि.१९) या विषयाला घेऊन तहसील कार्यालयात विशेष बैठक घेतली.

बैठकीत आमदार कोरोटे यांनी, संबंधित यंत्रणेची झडती घेऊन लवकरात लवकर योजनेची पाइपलाइन पूर्ववत करण्याचे कडक निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग (देवरी) अधिकाऱ्यांना दिले. यावर उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ काम संबंधित कंत्राटदार कंपनीकडून करून घेण्याची हमी दिली. यामुळे आठवडाभरात तालुक्यातील मुख्य ठिकाणापासून तुटलेल्या पाइपलाइनचे काम पूर्ण होणार असून, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. बैठकीला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संजय बहेकार, तहसीलदार डी.एस. भोयर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपविभागीय अभियंता कटरे, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, एम.बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी व शिवालय कंपनीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Undo the pipeline of Bangaon water supply scheme immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.