बेरोजगार युवक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:53 PM2017-09-12T23:53:48+5:302017-09-12T23:53:48+5:30
युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे याकरिता जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या युवा बेरोजगार संघटनेच्या बॅनरखाली हजारो सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे याकरिता जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या युवा बेरोजगार संघटनेच्या बॅनरखाली हजारो सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना व्हिडिओकॉन, अशोक लेलँड, सनफ्लॅग, अदानी येथे बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे, शासकीय व निमशासकीय कार्यालयात बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने काम द्यावे, मुद्रा लोन गरजू बेरोजगारांना द्यावे, औद्योगिकक्षेत्र वाढविण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर विध्यार्थ्यांना मानधन देण्यात यावे,भेल प्रकल्पग्रत शेतकरी मुलांना प्रमाणपत्र देण्यात यावे शासकीय रिक्त पदे भरावे, आदी मागण्या घेऊन बेरोजगार युवकांनी एल्गार पुकारला. बेरोजगारांच्या मोर्च्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. बेरोजगारांचा मोर्चा गुरुदत्त मंगल कार्यालयासमोरुन सुरु करण्यात अला.
त्रिमुर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोचार्चे सभेत रुपांतर झाले. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो बेरोजगार युवकांना संस्थापक बाळू चुन्ने, कल्याणी भुरे, किशोर पंचभाई, डॉ. अजय तुमसरे, तोमेश्वर पंचभाई, सुधन्वा चेटुले यांनी संबोधित केले. यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देऊन लवकर मागण्या मंजुर करावे, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. संचालन प्रशांत घरडे यांनी प्रास्तावीक सुधन्वा चेटुले यांनी केले. आभार प्रकाश हेमने यांनी मानले.
मोर्च्यासाठी डॉ.मोहन राऊत, नितीन तुमाने, नरेश करंजेकर, दिगांबर वंजारी, राकेश राऊत, गुणवंत दिघोरे, अक्षय रामटेके, ओमप्रकाश तिबुडे, शिलमंजू सिंव्हगडे, बाबुराव भिसे, ऋषी गोमासे, विजय देव्हारे, किरण सातव, दीपक चिमनकार, प्रमोद राऊत, राकेश राऊत, योगेश महावाडे किशोर बागमारे, रितेश झोडे, संदीप राऊत आदींनी प्रयत्न केले. या मोर्चात जिल्हाभरातुन शेकडो युवक सहभागी झाले होते.