युनिफेरो कारखाना सुरू होणे दिवास्वप्न ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:01 PM2018-07-11T22:01:16+5:302018-07-11T22:01:46+5:30

युनिव्हर्सल फेरो अँड अलाईज केमीकल लि. युनिफेरो कारखाना मागील २० वर्षापासून बंद पडलेला आहे. तो पूर्ववत सुरु होण्याकरिता वीज महामंडळाने तीन वर्षात कारखाना सुरु करण्याच्या अटीवर २०० कोटी रुपयाचे वीज बिलही माफ केले.

Unifero factory startup day | युनिफेरो कारखाना सुरू होणे दिवास्वप्न ठरणार

युनिफेरो कारखाना सुरू होणे दिवास्वप्न ठरणार

Next
ठळक मुद्दे२०० कोटी रुपये माफ होऊनही कारखाना बंदच : वेस्टेज मटेरियल विकून बँकांचे कर्ज फेडले

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : युनिव्हर्सल फेरो अँड अलाईज केमीकल लि. युनिफेरो कारखाना मागील २० वर्षापासून बंद पडलेला आहे. तो पूर्ववत सुरु होण्याकरिता वीज महामंडळाने तीन वर्षात कारखाना सुरु करण्याच्या अटीवर २०० कोटी रुपयाचे वीज बिलही माफ केले. त्याबरोबरच वेस्टेज मटेरियल मॅग्नीज विकून बँकेचे कर्ज देण्याचे आदेश दिले. मात्र अजूनपर्यंत कारखाना सुरु करण्यासंदर्भात कंपनीने कोणतेही पाऊल उचलले नाही. कारखाना सुरु होण्याचे स्वप्न हे केवळ आता दिवास्वप्न ठरले आहे.
तांत्रिक अडचणी व २५० कोटी रुपयाचे वीज बिल थकीत झाल्याने सन १९९८ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत झाल्याने सन १९९८ मध्ये युनिफेरो कारखाना हा कारखाना मालकाने बंद पाडला. त्यामुळे कारखान्यात काम करणारे तीन हजार पाचशे कामगारांवर बेरोजगारी व लाचारीचे संकट कोसळले. कारखाना सुरु व्हावे म्हणून अनेकदा लोकप्रतिनिधींना निवेदने, धरणे, मोर्चे काढण्यात आले. तर त्यातील काही कामगारांनी न्यायालयातही धाव घेतली. परंतु न्याय मिळाला नाही. दरम्यान १ आॅक्टोबर २०१३ मध्ये शासनाने कारखाना मालकाकडून थकीत वीज बिलाचे ४६ कोटी २० लाख २४ हजार ३८० रुपये वसूल करून तीन वर्षात कारखाना सुरु करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा या अटीवर २०० कोटी रुपयांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले. दरम्यान वीज महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्याने दि.२१ जुलै २०१५ रोजी कारखाना मालकाला कारखाना सुरु करण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्या पत्राला केराची टोपली दाखविली.

अभय योजनेत वीज बिल माफ करूनही कारखाना सुरु झाला नाही. शासनाला ही चपराक आहे. बंद कारखान्यामुळे कामगार बेरोजगार झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत.
डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेसचे नेते, तुमसर.
शासनाची फसवणूक करून २०० कोटी रुपयाचे बिल माफ केले व अरबो रुपयाची मॅग्नीजही विकण्यात आली. परंतु कारखाना सुरु करण्यासंदर्भात कोणतेही हालचाली नाही. मालकाने तात्काळ कारखाना सुरु करून स्थानिकांची बेरोजगारी दूर करावी.
-के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य, भंडारा.

Web Title: Unifero factory startup day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.