बांबूपासून साकारली अनन्यसाधारण कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:41 PM2018-09-15T22:41:51+5:302018-09-15T22:42:09+5:30
एखाद्याच्या अंगी जन्मजात असलेली कला त्याला उच्चपातळीवर घेवून जाते. परंतु त्याला छंदाची जोड मिळाली तर ती कला अनन्यसाधारण ठरते. असाच प्रत्यय तथा हुरहुन्नरी छंद जोपासणाऱ्या देवेंद्र निलकंठ आकरे यांनी बांबूपासून निर्मित केलेल्या वस्तु बघीतल्या नंतर आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एखाद्याच्या अंगी जन्मजात असलेली कला त्याला उच्चपातळीवर घेवून जाते. परंतु त्याला छंदाची जोड मिळाली तर ती कला अनन्यसाधारण ठरते. असाच प्रत्यय तथा हुरहुन्नरी छंद जोपासणाऱ्या देवेंद्र निलकंठ आकरे यांनी बांबूपासून निर्मित केलेल्या वस्तु बघीतल्या नंतर आला.
देवेंद्र आकरे हे भंडारा शहरातील सहकार नगर येथील रहिवासी असून बालपणापासूनच त्यांना निसर्ग निर्मित साहित्यांची ओढ होती. आपणही काही करु शकतो या भावनेनी त्यांनी प्रथम चित्रकला, सुंदर हस्ताक्षर या माध्यमातून कला अविष्काराला जन्म दिला. हळूहळू निसर्गत: मिळालेल्या उपजत गुणांना विकसित करत देवेंद्र यांनी बांबूपासून विविध वस्तु बनविण्याला प्रारंभ केला.
विशेष म्हणजे टाकावू पासून टिकावु वस्तु व तेवढ्याच निसर्ग निर्मित कशा बनविता येईल यावर त्यांनी बारकाईने लक्ष दिले. आजघडीला त्यांनी बांबूपासून विविध कलात्मक वस्तु बनविल्या असून ते त्यांच्या संग्रहात आहेत. बांबूपासून निर्मित वस्तुंमध्ये ट्रे, वाटी, चमचा, लाईट लॅम्प, पेनबॉक्स, जहाज, घर, हळदकुंकू करंडा, यासह अनेक वस्तुंचा समावेश आहे. वस्तु बनविण्यासाठी निसर्गापासून प्राप्त वस्तुंचा ते वापर करीत असतात. अर्थातच यासाठी त्यांना कुटूंब व मित्रांचीही मोठी मदत तथा प्रेरणा मिळत असते.