जिल्ह्यातील लिपिकांची एकता ठरली लक्षणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:20 PM2018-11-30T23:20:24+5:302018-11-30T23:20:38+5:30
राज्यातील विविध २१ विभागातील सुमारे सहा हजार लिपिक संवर्गीय कर्मचारी वेतन समानीकरणासाठी मुंबई येथे मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले. वेतनातील तफावत दूर करण्यासह समान काम, समान पदनाम, समान वेतन ही मागणी लावून धरण्यात आली. यावेळी भंडारा जिल्ह्यातील लिपिकांची एकता संपूर्ण महाराष्ट्रात लक्षणीय ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील विविध २१ विभागातील सुमारे सहा हजार लिपिक संवर्गीय कर्मचारी वेतन समानीकरणासाठी मुंबई येथे मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले. वेतनातील तफावत दूर करण्यासह समान काम, समान पदनाम, समान वेतन ही मागणी लावून धरण्यात आली. यावेळी भंडारा जिल्ह्यातील लिपिकांची एकता संपूर्ण महाराष्ट्रात लक्षणीय ठरली.
या आंदोलन विजय बोरसे, कार्याध्यक्ष सूर्यकांत इंगळे, सरचिटणीस उमाकांत सूर्यवंशी, राज्य समन्वयक शिवाजी खांडेकर, विजय धोत्रे, संजय कडाळे, राज्य उपाध्यक्ष राजू रणवीर, राज्य महिला संघटक आरती तायडे बापूसाहेब कुलकर्णी, मुकुंद पालटकर, डॉ. गजानन देसाई सहभागी झाले होते. शासनाच्यावतीने हक्क परिषदेच्या शिष्टमंडळास पाचारण करण्यात आले. शासनाच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. लिपिक संवर्गीय कर्मचाºयांच्या ग्रेड वेतनातील तफावती दूर करुन वेतन समानिकरणासाठी आश्वासित करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावरून कर्मचाºयांच्या व्यापक हिताचा विचार सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले.
शासनाच्यावतीने मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी महिन्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून आंदोलन करण्याचा इशारा राज्य कार्यकारणीच्यावतीने अध्यक्ष विजय बोरसे यांनी दिला. भंडारा जिल्ह्यातील लिपीकांची एकता संपूर्ण महाराष्ट्रात लक्षणिय ठरली अशी माहिती विभागीय अध्यक्ष केशरीलाल गायधने यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभु मते कार्याध्यक्ष मनिष वाहणे, सचिव यशवंत दुणेदार, दिलीप सोनुले, विजय सार्वे, सुधाकर चोपकर माहिला प्रतिनिधी निता सेन, वनिता सार्वे, रगडे, प्रदीप राऊत, संजय झेलकर , प्रदीप सोमवंशी , योगेश धांडे, नितेश गांवडे , रवी भुरे, लक्ष्मीकांत घरडे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रामुख्याने या आंदोलनात सहभागी झाले होते.