'लोकमत रक्ताचं नातं' लोगोचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:25+5:302021-06-24T04:24:25+5:30

बॉक्स ‘लोकमत’चा उपक्रम स्तुत्य : सुनील मेंढे लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या कोरोना काळात ...

Unveiling of 'Lokmat Raktacha Naat' logo | 'लोकमत रक्ताचं नातं' लोगोचे अनावरण

'लोकमत रक्ताचं नातं' लोगोचे अनावरण

Next

बॉक्स

‘लोकमत’चा उपक्रम स्तुत्य : सुनील मेंढे

लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या कोरोना काळात रक्ताची कमतरता भासत आहे. अशा संकटकाळात ‘लोकमत’ने आपली सामाजिक जबाबदारी जोपासत ही मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभर राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.

बॉक्स

रक्तदानाने जीव वाचवा -वसंत जाधव

सध्या महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. मात्र, रक्ताचा अपेक्षित पुरवठा होत नाही. रक्त्दानातून जिल्ह्यातील रक्ताची गरज पूर्ण करता येणे शक्य आहे. ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले.

बॉक्स

जिल्हाभर रक्तदान शिबिरे

भंडारा - २ जुलै

साकोली - ६ जुलै

पवनी - ८ जुलै

लाखनी - १० जुलै

मोहाडी - १३ जुलै

तुमसर - १५ जुलै

लाखांदूर - १७ जुलै

Web Title: Unveiling of 'Lokmat Raktacha Naat' logo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.