खडीकरण रस्ता बांधकामात निकृष्ट दगडांचा वापर

By Admin | Published: April 3, 2016 03:49 AM2016-04-03T03:49:45+5:302016-04-03T03:49:45+5:30

नागरी सुविधा अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे खडीकरण रस्त्यावर बारीक व कमकुवत खडी असलेल्या दगडाचा वापर होत आहे.

The use of crooked stones in the construction of the road | खडीकरण रस्ता बांधकामात निकृष्ट दगडांचा वापर

खडीकरण रस्ता बांधकामात निकृष्ट दगडांचा वापर

googlenewsNext

ठाणा येथील सरपंचाची तक्रार : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
जवाहरनगर : नागरी सुविधा अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे खडीकरण रस्त्यावर बारीक व कमकुवत खडी असलेल्या दगडाचा वापर होत आहे. या आशयाची तक्रार ठाणा येथील सरपंच कल्पना निमकर यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे दहा हजारांच्या घरात पोहचली आहे. येथे पाच वॉर्ड असून १३ ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. येथे सरपंच पद सर्वसाधारण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असून सरपंच कल्पना निमकर कार्यरत आहे. येथे नागरी सुविधा योजनेअंतर्गत वॉर्ड क्रमांक दोन विवेकानंद कॉलोनी मध्ये खडीकरणाचे ११ लाख रुपये किंमतीचे रस्ते बांधकाम सुरु आहे. ई -निविदा अंतर्गत जय बजरंग मिनरल माडगी नावाने रस्ता बांधकाम सुरु आहे. ग्रामपचांयत स्तरावर सरपंच कल्पना निमकर यांनी कामाची पाहणी केली असता रस्ता बांधकामात बारिक व कमकुवत खडी दगडचा वापर होत असल्याचे दिसले. सदर कामाचे इस्टीमेटनुसार खडी वापरण्यात यावी. आणि इतर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीचे परिक्षण करुन रस्ता बांधकाम सुरु करावे, अशा आशयाची तक्रार सरपंच यांनी २९ फेब्रुवारी रोजी गट विकास अधिकारी यांना सादर केलेली होती. याबाबीवर बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने वॉर्ड वासीयांमध्ये प्रशासनाविरुध्द आक्रोश आहे. (वार्ताहर)

रस्ता बांधकामात वापरलेली ८० व ४० एम.एम. आकाराची खडी व मुरुम हे प्रयोगशाळेत पाठविले असुन वापरण्यास योग्य असल्याचा दाखला प्राप्त झाला. त्यामुळे बांधकाम करण्यास सुरुवात केली. बांधकामात गैरप्रकार केलेला नाही.
- यु. एच. ढेंगे
शाखा अभियंता, भंडारा.

Web Title: The use of crooked stones in the construction of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.