वाहनामध्ये घरगुती गॅसचा वापरवाहनामध्ये घरगुती गॅसचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:13 IST2018-05-20T22:13:24+5:302018-05-20T22:13:38+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव सडक येथे चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलींडरचा वापर तथा गॅस भरत असतांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांनी संयुक्तपणे केली.

वाहनामध्ये घरगुती गॅसचा वापरवाहनामध्ये घरगुती गॅसचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव सडक येथे चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलींडरचा वापर तथा गॅस भरत असतांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांनी संयुक्तपणे केली.
प्राप्त माहितीनुसार लाखनी शहराला लागून असलेल्या मानेगाव सडक येथे अनिल मोटर्स व दिपक मोटर्स नावाच्या दुकानात घरगुती वापराचे गॅस सिलिंडर खाजगी चारचाकी वाहनामध्ये भरले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश धुसर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना महिती दिली. यात सदर ठिकाणी धाड घालून तिन जणांना पकडण्यात आले. तसेच त्यांच्या ताब्यातून ११ गॅस सिलिंडर तथा अन्य साहित्य मिळून १ लक्ष ६५ हजार ७५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सोलसे, सहा. पोलीस निरीक्षक विजय पोटे तथा अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.