केळी पिकविण्यासाठी ‘इथेफॉन’ रसायनांचा वापर !

By Admin | Published: September 25, 2015 12:26 AM2015-09-25T00:26:11+5:302015-09-25T00:26:11+5:30

व्रतवैकल्यामुळे भाद्रपद मासात फळामध्ये सर्वांत जास्त केळीचे सेवन केले जाते. त्याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक इथेफॉनसारख्या घातक रासायनिक द्रवाची ....

Use of 'Ethafon' chemicals to grow banana! | केळी पिकविण्यासाठी ‘इथेफॉन’ रसायनांचा वापर !

केळी पिकविण्यासाठी ‘इथेफॉन’ रसायनांचा वापर !

googlenewsNext

प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ
भंडारा : व्रतवैकल्यामुळे भाद्रपद मासात फळामध्ये सर्वांत जास्त केळीचे सेवन केले जाते. त्याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक इथेफॉनसारख्या घातक रासायनिक द्रवाची अधिक मात्रा वापरून झटपट केळी पिकवत ती बाजारात आणत असल्याचे वास्तव समोर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, शेतीतून काढल्यानंतर मालाची वाहतूक करण्यापूर्वीच ही केळी घातक रसायनातून काढली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जात आहे. विशेष म्हणजे, केळी पिकविताना या द्रवाची मात्रा वाढल्यास यकृताचा आजार व कर्करोग होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी तालुक्यात केळीचे उत्पादन घेतले जाते.
केळीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर व्यापारी परिसरातील केळीची बाग विकत घेतात. त्यानंतर कापणी व वाहतूक केली जाते. तथापि, शेतीतून केळी निघाल्यानंतर वाहतुकीपूर्वीच ही केळी घातक रसायनामध्ये बुडवून प्लास्टिक केट्रमध्ये भरली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. उपवासाला या फळाला मोठी मागणी असते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Use of 'Ethafon' chemicals to grow banana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.