राष्ट्रीयभाषा हिंदीचा वापर करा

By admin | Published: February 4, 2017 12:20 AM2017-02-04T00:20:50+5:302017-02-04T00:20:50+5:30

देशात प्रत्येक भाषेप्रमाणे हिंदीचाही वापर होतो. मात्र, हिंदी ही राष्ट्रभाषा असतानाही तिचा कमी वापर होत असून इंग्रजीचा वापर अधिक होताना दिसून येतो.

Use national language Hindi | राष्ट्रीयभाषा हिंदीचा वापर करा

राष्ट्रीयभाषा हिंदीचा वापर करा

Next

ई. आर. शेख : आयुध निर्माणीत नराकस बैठकीत मार्गदर्शन
भंडारा : देशात प्रत्येक भाषेप्रमाणे हिंदीचाही वापर होतो. मात्र, हिंदी ही राष्ट्रभाषा असतानाही तिचा कमी वापर होत असून इंग्रजीचा वापर अधिक होताना दिसून येतो. त्यामुळे प्रत्येकाने कार्यालयीन कामात हिंदीचा वापर करून उत्तरोत्तर विकास करावा, असे प्रतिपादन आयुध निर्माणी भंडाराचे महाप्रबंधक तथा नराकसचे अध्यक्ष ई. आर. शेख यांनी व्यक्त केले.
आयुध निर्माणी जवाहरनगर येथे नगर राजभाषा कार्यान्वय समितीची (नराकास) बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. हिंदी भाषेचा उत्तरोत्तर विकास आणि राष्ट्रीय भाषाचे कार्यान्वयन समिक्षा करण्याच्या दृष्टिने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ई. आर. शेख हे होते. यावेळी आयुध निर्माणीचे वरिष्ठ अधिकारी सी. एच. आंबेडकर, अप्पर महाप्रबंधक डॉ. चंद्रकांत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने सुचित केलेल्या निर्देशाप्रमाणे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हास्तरावरील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, बँक आणि उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यालयीन कार्यात हिंदी राष्ट्रीय भाषेचा अधिकाधिक उपयोग व राजभाषा हिंदी कार्यान्वय करताना निर्माण होणारी समस्या व समस्यांचे निराकरण या सर्व बाबींवर चर्चासत्र करण्याच्या हेतून या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला बीएसएनएल, केंद्रीय विद्यालय, भारतीय जीवन बीमा निगम, केंद्रीय उत्पादक शुल्क, सर्व राष्ट्रीयकृत बँक, केंद्रीय रेशिम उद्योग आदींसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Use national language Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.