सेवानिवृत्तांच्या अनुभवाचा वापर होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:31 PM2018-01-09T23:31:56+5:302018-01-09T23:32:52+5:30

पोलीस विभागाचे आधुनिकीकरण झाले. पोलीस दलात अनेक नवीन हत्यारे आली. परंतु, ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या विभागात घालविले त्यांच्या अनुभवाचे महत्व मोजले जाऊ शकत नाही.

Use of retirement experience should be used | सेवानिवृत्तांच्या अनुभवाचा वापर होणे गरजेचे

सेवानिवृत्तांच्या अनुभवाचा वापर होणे गरजेचे

Next
ठळक मुद्देविनीता साहू यांचे प्रतिपादन : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मेळावा

आॅनलाईन लोकमत
भंडारा : पोलीस विभागाचे आधुनिकीकरण झाले. पोलीस दलात अनेक नवीन हत्यारे आली. परंतु, ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या विभागात घालविले त्यांच्या अनुभवाचे महत्व मोजले जाऊ शकत नाही. या अनुभवाचा वापर झाला पाहीजे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.
महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन नागपूर जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने रविवारी येथील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्र माचे उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक विनीता साहू तर प्रमुख पाहूणे म्हणून सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष रमेश मेहता, सचिव सुरेश महाले, सहसचिव नागेश घोडकी, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विवेक कुरवाडे, सेवकराम कोरे, जिल्हाध्यक्ष शालिकराम झंझाड, मुख्य मार्गदर्शक पुंडलिक निखाडे उपस्थित होते. विनीता साहू पुढे म्हणाल्या, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अनुभव समुद्रासारखे असते.
जिल्ह्यात अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो, तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आपण घेऊ शकतो. आजच्या समस्यांचा तोडगा त्यांच्या अनुभवात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात रिटार्यमेंट येत असते. परंतु, चांगले काम करणाऱ्यांसाठी रिटार्यमेंट लागूच होत नाही. आजच्या या मेळाव्यातून सेवानिवृत्त कर्मचारी एकसंघ असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी संघटनेला आपण मजबूत बनवू. याशिवाय संघटनेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक बैठक घेऊ, असे त्यांनी नमूद केले. यावेळी पंच्याहत्तरी ओलांडलेल्या २३ सेवानिवृत्त पोलिस कर्मचाºयांचा व सन २०१७ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या ४३ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्तविक अरविंद हलमारे यांनी तर संचालन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शालिकराम झंझाड यांनी केले. कार्यक्रमासाठी ज.ग. नवखरे, ग. शा. भोवते, ध.सा. कोचे, प्र.स. तिरपुडे, नारायण माकडे, भिमराव उंदिरवाडे, हरिभाऊ ईश्वरकर, रवी लांजेवार, अमरसिंग राठोड, भाऊराव कोचे, भाऊराव बंसोड, बुधाजी निरगूडे, वसंतराव मडावी, विठोबा मेश्राम, रामकृष्ण माहूले, लक्ष्मीनारायण दोनोडे, अक्सार शेख, दुर्याेधन कडव, युवराज सिंगनजुडे, अरविंद हलमारे, यादोराव गणवीर, अरविंद मेश्राम, नामदेवराव ठोंबरे, भगवान वंजारी, महादेव पटले, नंदकिशोर माहूर्ले, मनोरमा बन्सोड, वसंतराव गाढवे, सुधाकर रोटकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Use of retirement experience should be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.