सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:02+5:302021-05-26T04:35:02+5:30

फेसबुक, व्हॉट्सॲप व ट्विटर या सोशल मीडियाचा वापर आता अनेक जण करीत आहेत. दैनंदिन कामकाजासोबत आर्थिक व्यवहारासाठीही त्याचा वापर ...

Use social media carefully | सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा

सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा

Next

फेसबुक, व्हॉट्सॲप व ट्विटर या सोशल मीडियाचा वापर आता अनेक जण करीत आहेत. दैनंदिन कामकाजासोबत आर्थिक व्यवहारासाठीही त्याचा वापर केला जात आहे. मात्र त्यातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. विविध बँकांनी ग्राहकांना कर्ज खात्या संबंधित इएमआयपुढे ढकलण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी सायबर गुन्हेगार बँक अधिकारी बोलत असल्याचे भासवून त्यांचे बँक खात्याचे संबंधित गोपनीय माहिती उदा. पिन, सीव्हीव्ही, ओटीपी प्राप्त करुन घेऊन फसवणूक करीत आहेत. सायबर गुन्हेगार ग्राहकांना बँकांच्या नावे एसएमएस पाठवून त्याद्वारे ॲनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्यूअर, एअर डॉइड आदी वेगवेगळे स्क्रिन शेअरिंग ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडतात व त्यांचा मोबाइल व संगणकाचा अनधिकृतपणे ताबा घेऊन फसवणूक करीत आहेत. कुठल्याही नवख्या व्यक्तीला वैयक्तिक माहिती पुरवू नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले.

बाॅक्स

अकाउंट हॅक करून केली जाते पैशाची मागणी

आपणास एखाद्या अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून आपल्या चेहऱ्याचे फोटो रेकॉर्ड करून त्यावरून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात येत असून, त्या माध्यमाद्वारे आपणाकडून पैसे सुद्धा उकळण्यात येण्याची शक्यता आहे. व्हॉट्सॲप मॅसेंजरसारख्या वापरकर्त्यांनी सुद्धा सतर्क राहणे आवश्यक झालेले आहे. फसवणूक करणारा अज्ञात व्यक्ती आपले फेसबुक अकाउंट हॅक करून फेसबुक मॅसेंजरद्वारे आपल्या फेसबुक फ्रेन्डशी चॅट करून पैशाची मागणी करण्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्यासाठी आपला ओटीपी कुणालाही शेअर करू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

बॉक्स

फसवणूक टाळण्यासाठी एवढे करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांनी कोणतीही पोस्ट करताना तिची शहानिशा करावी. तसेच त्या पोस्टमुळे लोकांच्या भावना दुखावणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.

कोणत्याही जवळच्या व्यक्तीचे नाव सांगून जर कोणी आपली वैयक्तिक माहिती अथवा पैशाची मागणी करीत असेल तर फोनवर प्रत्यक्ष बोलून शहानिशा करावी.

फेसबुक, व्हॉट्सॲपचे सेटिंग मध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रोसेस करून घ्यावी.

मोबाइलमध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकवर जाऊन आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.

ऑनलाइन पैसे पाठविण्याचे अगोदर योग्य शहानिशा करून घ्यावी.

आपली वैयक्तिक माहिती यूजर आयडी, पासवर्ड डायरीत अथवा दिसेल अशा कोणत्याही ठिकाणी लिहू नये.

ऑनलाइन अकाउंट गुगल पे, फोन पे, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर तसेच इतर महत्त्वाचे ॲपचे पासवर्ड हे गुंतागुंतीचे ठेवून ते पासवर्ड किमान दहा दिवसांनी बदल करावेत.

Web Title: Use social media carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.