बँकेतील दरोड्यात पांढऱ्या रंगाच्या वाहनाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:20+5:302020-12-26T04:28:20+5:30
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईमसह विविध सहा पथके तयार करण्यात आले आहे. विविध ठिकाणी ही पथके ...
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईमसह विविध सहा पथके तयार करण्यात आले आहे. विविध ठिकाणी ही पथके दरोडेखाेरांचा माग घेत आहेत. परंतु अद्यापपर्यंत या पथकाने कोणती महत्वपूर्ण माहिती पाठविली नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे दरोडेखोरांपर्यंत विलंब होत आहे. तुर्तास पोलिसांची चार चाकी वाहनावर तपास केंद्रीत केला आहे.
बॉक्स
दरोडेखोर चार ते पाचच्या संख्येने
सानगडी येथील स्टेट बँकेत दरोडा टाकणारे दरोडेखोरे चार ते पाचच्या संख्येने असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविण्यात येत आहे. बँकेच्या इमारतीची मागील खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करणे,
आतील लॉकर तोडणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यामुळे चार ते पाच पेक्षा अधिक दरोडेखोर असण्याची शक्यता आहे. त्यातच आता वाहनाचा वापर झाल्याचे तपासात पुढे येत आहे. कोट
सानगडी बँक दरोड्याचा तपास युद्धस्तरावर सुरू आहे. सहा पथके तयार करण्यात आले आहे. चोरांचे काही सुगावा पोलिसांच्या हाती लागला असून लवकरच चोरट्यांचा शोध लागेल.
-जितेंद्र बोरकर, ठाणेदार साकोली.