मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण; वाढतेय अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:24 AM2021-06-22T04:24:08+5:302021-06-22T04:24:08+5:30

गुंतवणूक म्हणून अनेक जण प्लॉट खरेदी करतात, बरेच वर्ष त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करीत नाही. बहुतेक जण तर सभोवताल ...

The vacant plot became difficult to handle; Increasing encroachment! | मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण; वाढतेय अतिक्रमण!

मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण; वाढतेय अतिक्रमण!

Next

गुंतवणूक म्हणून अनेक जण प्लॉट खरेदी करतात, बरेच वर्ष त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करीत नाही. बहुतेक जण तर सभोवताल संरक्षण भिंतीचेही बांधकाम करीत नाही, तसेच परगावी राहत असल्याने त्या प्लॉटकडे जातही नाही. याचाच फायदा घेत शेजारील व्यक्ती त्यावर अतिक्रमण करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे.

एनए प्लाॅट असल्यास त्यासंदर्भात कारवाई करून न्याय मिळण्याची शक्यता असते; मात्र अनधिकृतरीत्या ले-आऊट पाडले असल्यास त्यातून न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्लॉट खरेदी केल्यानंतर मालकांनी विशेष काळजी बाळगणे गरजेचे आहे. अनेक प्रकरणात प्लॉटवरून एकमेकांचे मुडधे पाडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सजग असणे गरजेचे आहे.

बॉक्स

एकच प्लॉट अनेकांना विकला

भंडारा शहरातील काही भागात एकच प्लॉट एकापेक्षा अधिक लोकांना विकल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी प्लॉट खरेदी करताना मूळ मालकांकडील कागदपत्रे तपासून संबंधित कार्यालयातून त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. नाहीतर फसवणुकीला आपणसुद्धा बळी पडू शकतो.

Web Title: The vacant plot became difficult to handle; Increasing encroachment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.